PMV Micro Electric Car: 16 नोव्हेंबरला येणारी छोटी इलेक्ट्रिक कार; 4 तासात होणार पूर्ण चार्ज, 200 KM पर्यंत धावेल
पासून 200 किमी पर्यंत पूर्ण चार्ज श्रेणी उपलब्ध होणार आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन मायक्रो इलेक्ट्रिक कार तिच्या 3 किलोवॅट एसी चार्जरने केवळ 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते.
देशात आता इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. अशा वाहनांमुळे तुमचा पेट्रोलचा ताण तर दूर होतोच, शिवाय पर्यावरणासाठीही अशा गाड्या चांगल्या आहेत. आता मुंबईस्थित इलेक्ट्रिक वाहन कंपनी पीएमव्ही इलेक्ट्रिक (PMV Electric) आपली पहिली मायक्रो इलेक्ट्रिक कार, EaS-E येत्या 16 नोव्हेंबर 2022 रोजी सादर करणार आहे. PMV चे हे भारतातील पहिले वाहन असेल. कंपनी या वाहनाद्वारे भारतीय बाजारपेठेत पर्सनल मोबिलिटी व्हेईकल (PMV) नावाचा एक नवीन विभाग तयार करणार आहे.
कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर या वाहनाचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. कंपनीने केवळ भारतातूनच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मोठी प्री-ऑर्डर बुक तयार केली आहे. PMV EAS-E मायक्रो इलेक्ट्रिक कार 10 kW लिथियम आयर्न फॉस्फेट बॅटरीवर काम करेल. हे 15 kW (20 bhp) PMSM इलेक्ट्रिक मोटरशी जोडले जाईल. त्याचा टॉर्क फिगर अद्याप समोर आलेला नसला तरी त्याचा टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असेल.
रिपोर्टनुसार, ही मायक्रो इलेक्ट्रिक कार तीन प्रकारात आणली जाईल, ज्यामध्ये 120 कि.मी. पासून 200 किमी पर्यंत पूर्ण चार्ज श्रेणी उपलब्ध होणार आहे. कंपनीचा दावा आहे की, नवीन मायक्रो इलेक्ट्रिक कार तिच्या 3 किलोवॅट एसी चार्जरने केवळ 4 तासांत पूर्ण चार्ज होऊ शकते. डायमेंशनबाबत बोलायचे झाल्यास, या इलेक्ट्रिक कारची लांबी 2,915 मिमी, रुंदी 1,157 मिमी आणि उंची 1,600 मिमी आहे. तसेच, त्याचा व्हीलबेस 2,087 मिमी असेल आणि ग्राउंड क्लिअरन्स 170 मिमी असेल. हेही वाचा: Electric Vehicles Costing: इलेक्ट्रिक वाहन विकत घेणाऱ्यांसाठी खुशखबर; किंमतीबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा)
इलेक्ट्रिक कारचे कर्ब वजन सुमारे 550 किलो असेल. PMV EAS-E मध्ये डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, USB चार्जिंग पोर्ट, एअर कंडिशनिंग, रिमोट कीलेस एंट्री, रिमोट पार्क असिस्ट, क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळतील. या स्मार्ट इलेक्ट्रिक कारबद्दल माहिती देताना, PMV इलेक्ट्रिकचे संस्थापक, कल्पित पटेल म्हणाले, ‘आम्ही देशाचे विद्युतीकरण करण्याची आकांक्षा बाळगतो आणि म्हणूनच आम्ही एक पूर्णपणे नवीन सेगमेंट सादर करणार आहोत ज्याचे नाव पर्सनल मोबिलिटी व्हेईकल असेल. ही कार रोजच्या वापरासाठी बनवण्यात आली आहे.’