भारतात लवकरच येणार नवी इलेक्ट्रिक मोटरसायकल; सिंगल चार्जमध्ये 150km चे अंतर कापणार

तर 2020 ऑटो एक्सपो मध्ये काही इलेक्ट्रिक वाहने झळकवण्यात आली होती. त्या मधीलच एक पुढील वर्षात मार्च महिन्यात लॉन्च केली जाणार आहे.

Okinawa Electric Bike (Photo Credits-Twitter)

Okinawa Electric Bike: इलेक्ट्रिक वाहनांच्या सेगमेंटमध्ये लवकरच आणखी एक नव्या वाहनाची एन्ट्री होणार आहे. तर 2020 ऑटो एक्सपो मध्ये काही इलेक्ट्रिक वाहने झळकवण्यात आली होती. त्या मधीलच एक पुढील वर्षात मार्च महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. रिपोर्ट्स नुसार, ओकिनावा त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक Oki100 मार्च 2021 मध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.(Year Ender 2020: यंदाच्या वर्षात भारतात लॉन्च झाल्या 'या' दमदार SUV, जाणून घ्या अधिक)

ओकिनावा ओकी100 इलेक्ट्रिक मोटरसायकल संपूर्णपणे भारतात तयार केली जाणार आहे. म्हणजेच बाईकचे अधिकतर पार्ट्स हे भारतातच बनवण्यात येणार आहेत. तर 2020 मध्ये एका मोटर शो मध्ये जे मॉडेल झळकवण्यात आले होते ते कंपनीचेच प्रोटोटाइम होते. तर प्रोडक्शन मॉडेल वेगळे असणार आहे. प्रोटोटाइप बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये मिनी नेक्ड रोडस्टार मोटरसायकलची झलक दिसणार आहे. ज्यामध्ये अंडाकार आकाराचे हेडलॅम्प, मस्क्युलर इंधन टँक, मिनिटल साइड पॅनल आणि दमदार हँडलबार दिला गेला आहे.

मोटरसायकलच्या बॅटरी पॅक बद्दल बोलायचे झाल्यास ही इलेक्ट्रिक टू-व्हिलर मध्ये ओकिनावा 2.5Kwh मोटरचे स्वॅपेबल लिथियम आयन बॅटरचा वापर केला जाणार आहे. तर या इलेक्ट्रिक मोटरसायकलची टॉप स्पीड जवळजवळ 100kmph तास असणार आहे. जी सिंगल चार्जमध्ये हाय स्पीड मोड मध्ये 150 किमी रेंज देण्यास सक्षम असणार आहे.(Volkswagen कंपनीने झळकवले त्यांच्या पॉवरफुल 2021 Tiguan R कारचे मॉडेल, किंमतीसह फिचर्स बद्दल घ्या जाणून)

ओकिनावा इलेक्ट्रिक मोटरसायकल ओकी100 मध्ये कनेक्टेड फिचर्स ही दिले जाणार आहेत. जे एका अॅपच्या माध्यमातून बाईकच्या मालकाचे गो-फेसिंग, व्हेईकल मोन्टिर स्टेट आणि बॅटरी चार्जिंग सारख्या सुविधांचा उपयोग करण्यास परवानगी देणार आहे. या व्यतिरिक्त सिंगल चॅनल अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, फ्रंटला युएसडी फॉर्क आणि पाठील बाजूल मोनोशॉक सस्पेंशनचा समावेश असणार आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास या बाईकची किंमत 1 लाखांहून अधिक असू शकते. मात्र अद्याप याबद्दल पुष्टी करण्यात आलेली नाही.