इलेक्ट्रिक वाहनांसाठी मुंबईत लवकरच 134 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार
त्यामुळे रस्त्यांवर सुद्धा वाहनांची गर्दी आणि स्वाभाविकपणे प्रदुषणात वाढ होत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात चार्जिंग सेंटर उभारण्याकडे लक्ष दिले जाणार आहे.
मुंबईतील एकूणच लोकसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रस्त्यांवर सुद्धा वाहनांची गर्दी आणि स्वाभाविकपणे प्रदुषणात वाढ होत आहे. यासाठी संपूर्ण राज्यात चार्जिंग सेंटर उभारण्याकडे लक्ष दिले जाणार आहे. त्यानुसार मुंबईत प्रथम चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहेत. या व्यतिरिक्त पर्यावरणाच्या संरक्षणासाठी इलेक्ट्रिक वाहनांची आवश्यकता आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठीच 134 चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यासाठी राज्य सरकारने तयारी सुद्धा सुरु केली आहे.(Aditya Thackeray On Electric Vehicles: सरकारी ताफ्यातील सर्व वाहने इलेक्ट्रिक असतील; पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची मोठी घोषणा)
चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम राज्याचे मालकी हक्क असणाऱ्या महात्मा फुले रिन्युएबल एनर्जी अॅन्ड इंफ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी लिमिटेड यांना दिले गेले आहे. कंपनी मुंबईत एकूण 1500 चार्जिंग सेंटर स्थापन करणार आहे. तर पहिल्या टप्प्यात 134 केंद्रांची उभारणी केली जाणार आहे. यासाठी कंपनीने एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टच्या रुपात टेंडर ही जारी केले आहे.(खुशखबर! महाराष्ट्र सरकारने 31 मार्च 2022 पर्यंत वाढवली Early Bird Benefits योजनेची मुदत; 'या' Electric Vehicles वर मिळत आहे भरपूर सवलत)
याअंतर्गत केंद्रे ही 12 वर्षांसाठी लीजवर उभारली जातील असे सांगण्यात आले आहे. यासाठी कमीत कमी 100 वर्ग मीटर जागेची गरज भासणार आहे. भविष्यात रस्त्यांवरुन धावणाऱ्या एकूण वाहनांच्या कमीत कमी 25 टक्के इलेक्ट्रिक गाड्यांचा समावेश असेल या दृष्टीने पावले उचलली जाणार आहेत. तर चार्जिंग स्टेशनवर वाहन मालकांना 5.50 रुपये प्रति युनिट अशा दराने शुल्क मोजावा लागणार आहे.