भारताची पहिली Maruti 800 कार तब्बल 36 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिमाखात
काळ बदलला भारतीय ऑटो उद्योगाने कात टाकली. रस्त्यांवर विविध कंपन्यांच्या गाड्या धाऊ लागल्या. 2010 मध्ये हरपल सिंह यांचेही निधन झाले. तेव्हापासून या कारला (DIA 6479) तसा कोणी मालक उरला नाही. दिल्ली येथील ग्रीन पार्क येथे Singh कुटुंबीयांच्या घराबाहेर ही कार गंज चढताना पाहायला मिळू लागली. परंतू, आता या कारला पुन्हा एकदा उर्जितावस्ता मिळणार आहे.
- Maruti 800 Car 1983 to 2019- journey , history and current status: इतरी वर्षं झाली तरी, भारतीय काही गोष्टी अजिबात विसरले नाहीत. जसे की, पार्ले बिस्किट, पार्ले चॉकलेट, फिलिप्स रेडिओ, एचएमटी घड्याळ वैगेरे वैगेरे. भारतीयांशी आपूलकीचे आणि जवळकीचे नाते जपलेली आणखी एक अशीच गोष्ट म्हणजे Maruti 800. आजकाल ही गाडी दुर्मिळ झाली असली तरी, भारतीयांच्या मनात मात्र आजही ती कायम आहे. कदाचित आपल्याला माहिती नसेल, पण मारुती Maruti 800 उद्योगाचा पाया राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांनी रचला. 14 डिसेंबर 1983 मध्ये पहिली मारुती कार बाजारात आली. या पहिल्या वहिल्या मारुती कारची चावी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी हरपल सिंह (Harpal Singh) यांच्याकडे सोपवली. या गाडीचा क्रमांक होता DIA 6479.
दरम्यान, काळ बदलला भारतीय ऑटो उद्योगाने कात टाकली. रस्त्यांवर विविध कंपन्यांच्या गाड्या धाऊ लागल्या. 2010 मध्ये हरपल सिंह यांचेही निधन झाले. तेव्हापासून या कारला (DIA 6479) तसा कोणी मालक उरला नाही. दिल्ली येथील ग्रीन पार्क येथे Singh कुटुंबीयांच्या घराबाहेर ही कार गंज चढताना पाहायला मिळू लागली. परंतू, आता या कारला पुन्हा एकदा उर्जितावस्ता मिळणार आहे. या ऐतिहासिक कारला Maruti सर्विस सेंटरमध्ये पुन्हा एकदा रिस्टोअर करण्यात येत आहे. या कारच्या निमित्ताने Maruti 800 च्या इतिहासाविषयी थोडक्यात.
मारुती कंपनीने या कारला Hindustan Ambassador आणि Premier Padmini या गाड्यांना टक्कर देण्यासाठी बाजारात उतरवले. Maruti 800 ही गाडी नशीब घेऊनच आली. पदार्पण होताच ही गाडी प्रचंड लोकप्रिय ठरली. किंमत आणि मायलेज या दोन्हीत ही गाडी Hindustan Ambassador आणि Premier Padmini पेक्षा सरस ठरली. अगदी विक्रमी पद्धतीने ही गाडी 30 वर्षे मार्केटमध्ये टीकून राहिली.
Maruti 800 च्या पहिल्या मॉडेलमध्ये 796 सीसी, 3 सिलिंडर F8D पेट्रोल इंजिन होते. जे आज Alto 800 आणि Omni गाड्यांमध्ये पाहायला मिळते. या गाडीच्या इंजिनची खासियत अशी की, त्याचा मेंटेनन्स फारच कमी होता. Maruti 800 नंतर एक काळ असा आला की, Alto 800 लोकांना आवडू लागली. कारण Alto 800 चे पॉवरफूल इंजिन, लुक्स आणि फीचर्स या तूलनेत Maruti 800 काहीशी मागे पडली. असे असले तरीसुद्धा ही गाडी मार्केटमध्ये तग धरुन होती. आजही ही गाडी रस्त्यावर शानदारपणे धावताना दिसते. (हेही वाचा, पेट्रोल, डिझेल गुड बाय, आता आली सिंगल पॅसेंजर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त 11 लाख रुपये)
विशेष असे की, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे सलग 10 वर्षे पंतप्रधान राहिले. परंतू, त्यांनी 2013 मध्ये निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकाच कारचा उल्लेख होता. ती कार होती Maruti 800. भारताच्या आर्थिक सुधारणांचे महत्त्वाचे सूत्रधार असलेल्या मनमोहन सिंग यांच्याकडे आजही 1996 मॉडल मारुति सुजुकी 800 कार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)