तरुणांमध्ये लोकप्रिय बाइक KTM 390 भारतात बंद, जाणून घ्या कारण

रिपोर्टच्या मते, कंपनीच्या अधिकृत डिलरशीपकडून सुद्धा या बाइकची बुकिंग घेणे बंद केले आहे.

भारतात तरुणांमध्ये लोकप्रिय बाइक KTM 390 कंपनीने आपली वेबसाइटवरुन हटवण्यावली आहे. रिपोर्टच्या मते, कंपनीच्या अधिकृत डिलरशीपकडून सुद्धा या बाइकची बुकिंग घेणे बंद केले आहे. तर ही कंपनीची सर्वाधिक पॉवरफुल मोटरसायकल असून जी 2013 मध्ये EICMA आंतरराष्ट्रीय मोटरसायकल शो मध्ये झळकवल्यानंतर 2014 मध्ये लॉन्च केली होती. केटीएम 390 वेबसाइटवरुन हटवण्यामागील कारण म्हणजे लवकरच याचे नवे वर्जन लॉन्च केले जाणार आहे.

रिपोर्टनुसार, नव्या वर्जनच्या मोटरसायकलमध्ये काही अपडेट सुद्धा दिले जणार आहे. ज्यामध्य स्लिपर क्लचसह एक अपडेटेड इंजिन, अंडबेली एग्जॉस्टच्या ऐवजी साइड स्लंग एग्ज्हॉस्ट सिस्टिमचा समावेश आहे. तर मोटरसायकलच्या डिझाइनमध्ये सुद्धा कंपनी काही रंग आणि कलर ऑप्शनसह ग्राफिक्सचा वापर केला जाणार आहे.(मोटर सायकल खरेदी केल्यानंतर फ्री मिळणार हेल्मेट, 'या' राज्याने केली सुरुवात)

केटीएम इंडियाची वेबसाइटवर आउटगोइंग मोटरसायकल बंद करण्यात आली आहे. तर नव्या जनरेशनची मोटरसायकल लॉन्च करण्याबद्दल अद्याप तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही. मात्र रिपोर्टनुसार, पुढील काही आठड्यात ती लॉन्च केली जाऊ शकते.नवे जनरेशन केटीएम RC 390 सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक वेगळी असणार आहे. यामध्ये ड्युअल प्रोजेक्टर लँम्प हा एका एलई़डी युनिटमध्ये बदलला जाणार आहे. जो सध्याच्या जनरेशन 390 ड्युकमधून घेण्यात आला आहे.(ट्रायम्फने भारतात लॉन्च केली Bonneville ची नवी रेंज, किंमतीसह फिचर्मध्ये करण्यात आले बदल)

यामध्ये एक लिक्विड-कू्ल्ड 373cc, सिंगल सिलेंडर इंजिन दिले जाणार आहे.जो आउटगोइंग मॉडेलमध्ये 42.9bhp आणि 36Nm चे टॉर्क जनरेट करणार आहे. सध्या हे जुने मॉडेल बंद होण्यासह नवे मॉडेलसुद्धा लॉन्च केले जाणार आहे. ज्याची किंमत आणि फिचर्सबद्दल माहिती लवकरच समोर येणार आहे.