Kia Sonet भारतात लॉन्च, किंमत 6.71 लाखांपासून सुरु

Kia Motors यांनी आज भारतात त्यांची नवी कॉम्पेक्ट एसयुवी Kia Sonet लॉन्च केली आहे. या नव्या कारची सुरुवाती किंमत 6.71 लाख रुपये आहे. कारच्या पॉवर आणि स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये रिफाइंड 1.5 CRDi डीझेल इंजिन दिले असून ते 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह (100 Ps ची पॉवर जनरेट करणार आहे)

Kia Sonet (Photo Credits-Twitter)

Kia Motors यांनी आज भारतात त्यांची नवी कॉम्पेक्ट एसयुवी Kia Sonet लॉन्च केली आहे. या नव्या कारची सुरुवाती किंमत 6.71 लाख रुपये आहे. कारच्या पॉवर आणि स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये रिफाइंड 1.5 CRDi डीझेल इंजिन दिले असून ते 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 100 Ps ची पॉवर जनरेट करणार आहे. तर  दुसरा (115Ps ची पॉवर) 6 स्पीड अॅडवान्स एटीसह येणार आहे. दुसऱ्या G1.0 T-GDi पेट्रोल इंजिन दिले आहे. जो 120 Ps ची पॉवर जनरेट करणार आहे. हे इंजिन 6iMT आणि 7DCT स्मार्टस्ट्रीमसह मिळणार आहे. तिसरा अॅडवान्स स्टार्टस्ट्रिम G1.2 पेट्रोल इंजिन दिले आहे. जो 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह (83Ps ची पॉवर) जनरेट करणार आहे.

Kia Sonet च्या कार मध्ये सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग्स, अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टिम, ईबीडी, रियर पार्किंग सेंसर, इमर्जेंसी स्टॉप सिग्नल सारखे फिचर्स दिले आहेत. इंटीरियर फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये 26.03cm टचस्क्रिन आणि 10.67cm कलर कलस्टर, फ्रंट वेंटिलेटिड सीट्स, स्मार्ट प्योअर एअर प्युरिफायरसह वायरस प्रोटेक्शन, मल्टी ड्राइव्ह मोड्स आणि टॅक्शन मोड्ससह एमटी रिमोट इंजिन स्टार्ट फिचर्स दिले आहेत.(Old Car Selling Tips: जुनी गाडी विकताना 'या' गोष्टी जरुर लक्षात ठेवा, मिळेल उत्तम किंमत)

कलर ऑप्शनसाठी ग्राहकांना Kia Sonet Clear White, Steel Silver, Intense Red, Gravity Gray आणि Black one tone उपलब्ध करुन दिले आहेत. डायमेंशन बद्दल बोलायचे धाल्यास Sonet ची लांबी 39995mm, रुंदी 1790mm आणि उंची 1610mm आहे.(Nexon XM(S) वेरियंट भारतात लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमतीसह फिचर्स)

एक्सटीरियर फिचर्ससाठी Kia Sonet मध्ये क्राउन ज्वेल एलईडी हेडलॅम्प, हर्टबीट एलईडी डीआरएलसह इंटीग्रेटेड इंडीकेटर, हर्टबीट एलईडी टेललॅम्प, इलेक्ट्रिक सनरुफ, R16 क्रस्टल कट अलॉयसह स्पोर्टी रेड सेंटर व्हिल कॅम्प, रेड ब्रेक कॅलिपर, किया सिग्नेचर टाइगर नॉज ग्रिल, फ्रंट बंपरसह स्पोर्टी रेड एक्सेंट, रियर बंपरसह ड्युअल मफ्लर डिझाइन आणि रेड एक्सेंट, टर्बो शेप्ड मस्कुलिन फ्रंट स्किड प्लेट्स, डिफ्युजर फिन रियर स्किड प्लेट, बेल्ट लाइन क्रॉम, फ्लोटिंग टाइप रुफ रेल. शार्क फिन एंटीना, आउटसाइड मिरर एलईडी टर्न सिग्नल, रेटिएटर ग्रिल क्रॉमसह डायमंड क्नरलिंग पॅटर्न, क्रॉम आउटसाइड डोर हैंडल, रेड डोर गार्निश आणि रियर सेंटर गार्निश रिफलेक्टर कनेक्टिड टाइप सारखे फिचर्स दिले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now