Hyundai Motor ने सुरु केली Freedom Drive, ग्राहकांना कमी किंमतीत सर्विसिंग करता येणार

यामागी मुख्य उद्देश म्हणजे वेळोवेळी आपल्या कारच्या ठेवणूकीबद्दल सांगता येईल.

ह्युंडाई (Photo Credits- Twitter)

देशातील पहिली स्मार्ट मोबिलिटी सॉल्यूशन देणारी कंपनी Hyundai Motor India Limited यांनी आज सर्व ह्युंदाई वर्क शॉप्स मध्ये राष्ट्रव्यापी Freedom Drive सुरु करण्याची घोषणा केली आहे. यामागी मुख्य उद्देश म्हणजे वेळोवेळी आपल्या कारच्या ठेवणूकीबद्दल सांगता येईल. या फ्रीडम ड्राइव्हमध्ये ग्राहकांना त्यांच्या ह्युंदाई कारसाठी लेबर, कार सॅनिटायझेशन आणि अंडर बॉडी कोटिंगवर विशेष ऑफरचा लाभ घेता येणार आहे. ही फ्रीडम ड्राइव्ह 14 ऑगस्ट पासून सुरु झाली असून 21 ऑगस्ट 2020 पर्यंत कायम राहणार आहे.

फ्रीडम ड्राइव्ह बद्दल बोलताना निर्देशक तरुण गर्ग यांनी असे म्हटले की, ह्युंदाई यांचे असे मानणे आहे की आयुष्यभर ग्राहकांनी त्यांचे पार्टनर व्हावे. याच कारणास्तव फ्रीडम ड्राइव्हच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम अनुभव देऊ शकते. कंपनीकडून सुरु करण्यात आलेल्या या सेवेमुळे ग्राहकांना वेळोवेळी कारच्या देखरेखीबद्दल माहिती दिली जाणार आहे.(Audi India यांनी लॉन्च केले नवे App, एका क्लिकवर बुक करता येणार सर्विसिंग ते टेस्ट ड्राइव्हची सुविधा)

>>डिलरशिप्सवर फ्रीडम ड्राइव्ह अंतर्गत ग्राहकांना मिळणार 'या' सुविधा

-नि:शुल्क 50 पॉइंट चेक आणि हाय-टच पॉइंट सॅनिटायझेशन

-कारची पूर्णपणे स्वच्छता पॅकेज Interior 599 पासून सुरु

-लेबर चार्जवर 20 टक्क्यांपर्यंत सूट

-अंडरबॉडी कोटिंवर पूर्ण 15 टक्के सूट

ह्युंदाई वेळोवेळी आपल्या ग्राहकांना उत्तम ऑफर्स आणि स्किम्स घेऊन येतात. या स्किम्स आणि ऑफर्समुळे ग्राहकांची खुप बचत होते. तर HMIL देशभरात उपलब्ध असून 1300 हून अधिक सर्विस आउटलेट्सच्या मदतीने ग्राहकांना सेवा प्रदान करतात. या आउटलेट्सच्या येथे ग्राहकांना कधी ही भेट देता येऊ शकते. त्याचसोबत कार सर्विसिंग ते अन्य महत्वाची माहिती सुद्धा मिळवू शकता.

कोरोनाच्या काळात कंपनीने त्यांच्या सेवा ग्राहकांना देण्यासाठी डीलशिप ऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत ग्राहकांना कोरोनाच्या संक्रमणापासून पूर्णपणे सुरक्षित राहून उत्तम सेवांचा लाभ घेता येणार आहे.