DigiLocker वर ड्रायव्हिंग लायसन्स कसं स्टोअर कराल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
तुम्ही चुकून ते विसरलात आणि पकडले गेलात तर तुम्हांला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही डिजिलॉकर वर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कसं स्टोअर करू शकता
डिजिटल इंडिया इनिशिएटीव्ह अंतर्गत भारत सरकार कडून आता DigiLocker Facility सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांची महत्त्वाची डॉक्युमेंट्स आता सुरक्षित पणे डिजिटल स्वरूपात साठवता येतात. यामध्ये फिजिकल पेपरचा समावेश नसतो. याचा फायदा असा की आता तुम्हांला फिजिकली पेपर घेऊन फिरावं लागत नाही.
दुचाकी, चारचाकी असलेल्यांना कटाक्षाने त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवावे लागते. तुम्ही चुकून ते विसरलात आणि पकडले गेलात तर तुम्हांला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे हा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही डिजिलॉकर वर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स कसं स्टोअर करू शकता हे जाणून घ्या आणि ते फिजिकली प्रत्येकवेळी घेऊन फिरणं टाळा. नक्की वाचा: New Vehicle Rules: सरकारकडून वाहतूकीच्या 'या' नियमात बदल, 1 एप्रिल 2022 पासून होणार लागू.
कसं लिंक कराल ड्रायव्हिंग लायसन्स?
- www.digilocker.gov.in या डिजिलॉकरच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- तुमचा मोबाईल नंबर वापरून साईन अप करा.
- तुम्हांला एक ओटीपी मिळेल. त्याचा वापर करून युजरनेम, पासवर्ड बनवा.
- तुम्ही MPIN देखील बनवू शकत. ज्यामध्ये भविष्यात पटकन लॉगिन करता येऊ शकतं.
- एकदा तुमचं अकाऊंट तयार झालं की त्यासोबत तुमचं आधारकार्ड देखील लिंक करा.
येथे, तुम्ही अॅपवरील ‘Pull Partner’s Document’ विभागात प्रवेश करू शकाल. या विभागात, तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक भरू शकता आणि अॅप अर्जासाठी परवाना सोर्स देईल. ‘Pull Document’ निवडल्यानंतर, तुम्हाला ज्या भागीदाराद्वारे दस्तऐवजाचा सोर्स घ्यायचा आहे ते निवडणे आवश्यक आहे, उदाहरणार्थ, या प्रकरणात, ते Ministry of Road, Transport, and Highways, All States आहे.
डॉक्युमेंट टाईप मध्ये Driving License शोधा आणि त्यावर टॅप करा. तुम्ही सारी आवश्यक माहिती भरल्यानंतर अॅप पार्टनर कडून डॉक्युमेंट शोधून अॅप मध्ये साठवून ठेवेल. युजर्सना अॅप मध्ये 1 जीबी पर्यंत डॉक्युमेंट्स साठवण्यासाठी जागा दिली जाते.
सर्व सरकारी विभागांना आता डिजीलॉकरसाठी असलेल्या दस्तऐवजाचे पालन करण्याचे आणि कोणत्याही सरकारी प्रक्रियेसाठी ते वापरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.