Honda X-Blade BS6 खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टींबाबत जरुर जाणून घ्या
भारतीय बाजारात होंडा कंपनीने नवी Honda X-Blade BS6 लॉन्च केली आहे. मार्केटमध्ये होंडाने Honda X-Blade दोन वेरियंट सिंगल डिस्क आणि डबल डिस्कमध्ये उतरवण्यात आली आहे.
भारतीय बाजारात होंडा कंपनीने नवी Honda X-Blade BS6 लॉन्च केली आहे. मार्केटमध्ये होंडाने Honda X-Blade दोन वेरियंट सिंगल डिस्क आणि डबल डिस्कमध्ये उतरवण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्हीसुद्धा Honda X-Blade खरेदी करण्याचा विचार करत असल्यास तर आम्ही तुम्हाला याबाबत याच्या खासियत बद्दल अधिक माहिती देणार आहोत.(नव्या कार विक्रीच्या नावाखाली डिलरकडून तुम्हाला जुनी गाडी दिली जातेय? फसवणूकीपासून 'या' पद्धतीने रहा सावध)
होंडा कंपनीची Honda X-Blade ची किंमत 1.05 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. पॉवर आणि स्पेसिफिकेशन बाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 160cc चे BS6 सिंगल सिलेंडर, एअर कुल्ड इंजिन दिले आहे. जे 8,000rpm वर 13.67 bhp ची पॉवर आणि 5500 rpm वर 14.7 Nm चा टॉर्क जनरेट करणार आहे. गिअरबॉक्स बाबत बोलायचे झाल्या यामध्ये इंजिनसाठी 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉरक्स पेक्षा कमी आहे. हे इंजिन फ्यूल इंजेक्शनसह 8 सेंसर पेक्षा कमी असून जे ऑप्टिमम लेव्हल पर्यंत फ्यूल आणि एअरला मिक्स करु शकतात. होंडा कंपनीने असा दावा केला आहे की, ही बाईक अधिक एफिशिएंसी आणि पॉवर देणार आहे. यामध्ये अतिरिक्त वायब्रेशनला कमी करण्यासाठी काउंटर बॅलेंसर आणि होंडाची इको टेक्नॉलॉजी (HET) दिली आहे.
कलर ऑप्शनसाठी कंपनीने चार वेरिएंट Pearl Spartan Red, Pearl Igneous Black, Matte Axis Grey Metallic आणि Matte Marvel Blue Metallic मध्ये उपलब्ध करुन दिली आहे. भारतीय बाजारात या बाईकची टक्कर Hero Xtreme 160R, Bajaj Pulsar NS160, TVS Apache RTR 1604V आणि Suzuki Gixxer 155 सोबत होण्याची शक्यता आहे.(BGauss A2 आणि BGauss B8 इलेक्ट्रिक स्कूटर ऑगस्ट 2020 मध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)
स्टाइल आणि डिझाइनसाठी BS6 X Blade मध्ये क्रॉस शेप्ड एलईडी हेडलाइट देण्यात आली आहे. तसेच रियरमध्ये टेल लाइट दिली असून जी एलईडी युनिटची असणार आहे. ही बाईक फ्युल टँकच्या नव्या कव्हरसह दिली आहे. एग्जॉस्टमध्ये ड्युअल आउटलेट्स आणि नवे ग्राफिक्स, व्हिल स्ट्रिप्स आणि स्लिप्ट ग्रेबमुळे अधिक शानदार दिसते.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)