Honda Forza 350 Maxi स्कूटर लॉन्च, खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत

ही सध्यातरी थायलंड येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही नवी स्कूटर Forza 300 चे रिप्लेसमेंट आहे. Honda Forza 350 जोन वेरियंट म्हणजेच- स्टँडर्ड आणि टूरिंग मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Honda Forza (Photo Credits-Twitter)

होंडा कंपनीने Forza 350 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. ही सध्यातरी थायलंड येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही नवी स्कूटर Forza 300 चे रिप्लेसमेंट आहे. Honda Forza 350 जोन वेरियंट म्हणजेच- स्टँडर्ड आणि टूरिंग मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची क्रमश: किंमत 1,73,500 THB म्हणजेच भारतीय चलनानुसार 4.16 लाख रुपये आणि 1,82,900 THB म्हणजे 4.35 लाख रुपये आहे. स्कूटरच्या दोन वेरियंट मध्ये मुख्य अंतर टॉप बॉक्स आहे. टूरिंग वेरियंटमध्ये टॉप बॉक्स स्टँडर्ड देण्यात आला आहे.

Forza 350 स्कूटरमध्ये नवे 329.6 cc, सिंगल-सिलिंडर, 4-वॉल्व, लिक्विड-कूल्ड इंजिन दिले आहे. तसेच 279 cc इंजिन असणाऱ्या तुलनेत या नव्या इंजिनमध्ये 500 cc अधिक क्षमता आहे. 279 cc असणारे इंजिन 25.1 hp ची पॉवर आणि 27.2Nm टॉर्क जनरेट करतो. होंडा कंपनीने नव्या स्कूटरच्या पॉवर आणि टॉर्क बाबत अधिक खुलासा केलेला नाही. परंतु कंपनीने असे म्हटले आहे की जुन्या इंजिनपेक्षा हे अधिक पावरफुल आहे. इंजिन CVT ट्रान्समिशन लेस आहे.(BMW S 1000 XR प्रो भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये इलेक्ट्रिकली अॅजस्टेबल विंडस्क्रिन, LED लाइट्स, किलेस इंग्निशन, डिजि-अॅनालॉग इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि युएसबी चार्जर सारखे फिचर्स दिले आहेत. स्कूटरमध्ये फोन आणि वॉटर बॉटल ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस दिला आहे. सीटच्या खाली हेलमेट ठेवण्यासाठी ही पुरेशी जागा दिली आहे.

नव्या होंडा फोर्जा 350 चे लूक जुने मॉडेल फोर्जा 300 सारखेच आहे. परंतु स्कुटरच्या बॉडी पॅनलवर पुन्हा काम करण्यात आले आहे. स्कूटरचे वजन 185 किलोग्रॅम असून जे पूर्वीपेक्षा 1 किलोग्रॅम अधिक आहे. नव्या स्कूटरचा ग्राउंड क्लियरेंस 147mm आणि याची फ्युल टॅंक कॅपासिटी 11.7 लीटर आहे. फोर्जा 300 च्या तुलनेत नवी स्कूटरसाठी ग्राउंड क्लियरेंस 3mm आणि फ्यूल टँक कॅपासिटी 0.2 लीटर पेक्षा अधिक आहे. सीट हाइट पहिल्यासारखीच 780mm देण्यात आली आहे.(Innova Crysta ची CNG वेरियंट लवकरच होणार भारतात लाँच; या महिन्यात होऊ शकते भारतीय बाजारात एन्ट्री)

होंडा फोर्जा 350 च्या फ्रंटला टेलेस्कोपिक फोर्क आणि रियरमध्ये ट्वीन अॅडजेस्टेबल शॉक ऑब्जॉर्बर्स सस्पेंशन दिले आहे. स्कूटरचा फ्रंट व्हिल 15 इंच आणि रियर व्हिल 14 इंचाचा आहे. दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक असून स्कूटर ड्युअल चॅनल एबीएस लेस आहे. ही स्कूटर सध्या थायलंडमध्येच लॉन्च करण्यात आली आहे. काही काळापूर्वीच भारतात त्यांच्या बिग विंग डीलरशीपच्या माध्यमातून 4 युनिट फोर्जा 300 मॅक्सी स्कूटरची विक्री केली आहे. तसेच असे ही म्हटले आहे की, फोर्जा 300 चे बीएस6 वर्जन आर्थिक वर्ष 2021 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. मात्र आता कंपनी भारतात फोर्जा 350 किंवा फोर्जा 300 बीएस6 कधी लॉन्च करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.