BS6 इंजिनसह Hero Maestro Edge 110 लॉन्च, जाणून घ्या किंमत
HeroMotoCrops ने त्यांची BS6 Maestro Edge 110 स्कूटर लॉन्च केली आहे. ही स्कूटर कंपनीच्या वेबसाईटवर गेल्या काही दिवसांपासून झळकवण्यात आली होती. परंतु त्यावेळी किंमत सोडून स्कूटरच्या अन्य फिचर्स संबंधित माहिती समोर आली होती. कंपनीने ही स्कूटर 60,950 रुपयांत लॉन्च केली आहे. ही किंमत ड्रम ब्रेक आणि अलॉय वील्जच्या Fi VX वेरियंटची आहे. तर टॉप अॅन्ड अलॉय वील्ड Fi ट्रिमला 62,450 रुपयांत लॉन्च करण्यात आली आहे.(Hero ची इलेक्ट्रिक स्कूटर आता 30 मिनिटांत चार्जिंग झाल्यास कापणार 130km चे अंतर, जाणून घ्या कंपनीच्या नव्या प्लॅन बद्दल अधिक)
स्कूटरच्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही दिसण्यास जुन्या BS4 मॉडेल सारखी आहे. परंतु सध्याच्या या नव्या स्कूटरसाठी कंपनीने अधिक बोल्ड ग्राफिक्सचा वापर केला आहे. त्यामुळे स्कूटरचा लूक अधिक अपीलिंग दिसत आहे.हिरो कंपनीची ही स्कूटर 110.9cc, सिंगल सिलिंडर, फ्यूल इंजेक्टेड इंजिनसह येणार आहे. जी 8hp टॉर्क आणि 8.75Nm पॉवर जनरेट करणार आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, नव्या मॉडेलपेक्षा ही अधिक उत्तम मायलेज आणि पिकअप देणारी आहे. तसेच मिडनाइट ब्लू, सील सिल्वर, पर्ल फियरलेस वाइट, पँथर ब्लॅक, कँन्डी ब्लेजिंग रेड, टेक्नो ब्लू रेड सारख्या रंगात लॉन्च केली आहे.(Motorcycle Care: सर्विसिंगच्या वेळी करण्यात आलेल्या 'या' चुकांमुळे कमी होते बाईकची मायलेज, जाणून घ्या अधिक)
स्कूटरमध्ये इंटिकेटर माउंटेड फ्रंट एप्रन, ऑलवेज आणि हॅलोजन हेडलाइट, फ्लॅट टाइप सीट आणि अलॉय वील्ज दिले आहेत. स्कूटरसाठी डिजिटल एनलॉग इंस्ट्रुमेंट पॅनल, USB सपोर्ट्स, एक्सटर्नल फ्यूल फिलर कॅप, साइड स्टँड इंडिकेटर आणि सर्विस रिमांइडर फॅसिलिटी दिली आहे. या व्यतिरिक्त स्कूटरमध्ये 5 लीटर फ्यूल टँक दिला आहे. स्कूटरचे वजन 112 किग्रॅ आहे.