प्रसिद्ध Segway बंद करणार आपल्या 'सेल्फ-बॅलन्स स्कूटर'चे उत्पादन; टूर गाइड्स आणि पोलीस फोर्ससाठी होते वरदान

प्रसिद्ध Segway कंपनी आपल्या 'सेल्फ-बॅलन्स स्कूटर'चे उत्पादन बंद करीत आहे. शहरातील टूर गाईड आणि पोलिस दलामध्ये ही दुचाकी अतिशय लोकप्रिय होती, परंतु सर्वसामान्यांमध्ये ही गाडी म्हणावी अशी लोकप्रिय झाली नाही.

Segway Electric Scooters (Photo Credits: ANI)

प्रसिद्ध Segway कंपनी आपल्या 'सेल्फ-बॅलन्स स्कूटर'चे उत्पादन बंद करीत आहे. शहरातील टूर गाईड आणि पोलिस दलामध्ये ही दुचाकी अतिशय लोकप्रिय होती, परंतु सर्वसामान्यांमध्ये ही गाडी म्हणावी अशी लोकप्रिय झाली नाही. सेगवेने  ही सेल्फ-बॅलेन्सिंग दुचाकी 2001 मध्ये लाँच केली होती, ज्यास पर्सनल ट्रांसपोर्टसाठी मोठ्या प्रमाणात पसंती अपेक्षित होती. सेगवे या गाडीला अमेरिकन अभियंता डीन कामेन (Dean Kamen) यांनी बनवले होते. दोन्ही बाजूंना चाके असणारी ही दुचाकी एकट्या प्रवाशासाठी अतोशय उपयुक्त होती.

ही गाडी किंचित पुढे झुकून चालवली जाते व मागच्या बाजूला झुकून मागे घेता येऊ शकते किंवा गाडीला वळविता येऊ शकते. ही स्कूटर मोठ्या प्रसिद्धीसह जोरदारपणे लाँच केली होती, परंतु नफा मिळविण्यासाठी या गाडीला फार धडपडावे लागले होते. म्हणूनच की काय आता अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर (New Hampshire) शहरातील कारखान्यात तयार होणाऱ्या या गाडीचे उत्पादन आता 15 जुलै रोजी बंद केले जाणार आहे. या बातमीबद्दल माहिती देताना सेगवेचे अध्यक्ष जुडी काय (Judy Cai) म्हणाले की, ‘पहिल्या दशकात सेगवे वैयक्तिक वाहतूकदारांचची सुरक्षा आणि कायद्याच्या अंमलबजावणीत मदत म्हणून महत्त्वपूर्ण बनले, ज्याकडे एक प्रभावी आणि कार्यक्षम वैयक्तिक वाहन म्हणून पाहिले गेले.’ (हेही वाचा: BS6 Honda Garzia 125 स्कूटर भारतात लॉन्च, जाणून घ्या याची खास वैशिष्ट्ये आणि किंमत)

यासह, Segway SE-3 Patroller आणि Segway Robotics Mobility Platform या दोन अन्य मॉडेल्सचे उत्पादन देखील थांबवले जाईल, ज्यामुळे 21 लोकांच्या नोकऱ्या जातील. कंपनीची ही स्कूटरही अनेक हाय-प्रोफाइल अपघातांनाही कारणीभूत ठरली आहे. त्यात 2015 मध्ये सेगवेवर चालत असताना कॅमेरामॅनने जमैकाचा वेगवान धावपटू उसैन बोल्ट यांच्याशी झालेल्या धडकीचा समावेश आहे. 2003 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुशसुद्धा त्यांच्या सेगवेवरून पडताना दिसले होते.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now