सिंगल चार्जमध्ये 130KM ची जबरदस्त रेंज देणार EeVe Soul इलेक्ट्रित स्कूटर, पहा कधी होणार लॉन्च
भारतात गेल्या काही वर्षांपासून दमदार इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च करण्यात आल्या आहेत. सुरुवातीला लेड अॅसिड बॅटरी असणारी स्कूटर लॉन्च केली होती. त्यांची रेंज कमी होती. मात्र आता लिथियम आयन बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च केल्या जात आहेत. ज्या सिंगल चार्जमध्ये जबरदस्त रेंज देण्यास सक्षम आहेत. अशातच EeVe India लवकरच भारतात आपली Soul इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करु शकते.(Automatic Hybrid Tractor: भारतामध्ये Proxecto ने सादर केला देशातील पहिला ऑटोमॅटिक हायब्रिड ट्रॅक्टर; ना गियर ना क्लच, जाणून घ्या वैशिष्ठ्ये आणि किंमत )
दाव्यानुसार, EeVe Soul एक हायस्पी इलेक्ट्रिक स्कूटर असणार आहे. ज्यामध्ये एक दमदार बॅटरीचा वापर केला जाऊ शकतो. खासियत अशी की, मार्केटमध्ये असलेला ट्रेंड पाहून या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये डिटॅचेबल बॅटरी दिली जाऊ शकते. त्याच्या मदतीने तुम्ही याची रेंज अधिक वाढवू शकता. यामुळे इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी चालकाला मोकळीक सुद्धा मिळते.
प्राप्त झालेल्या माहितीनुसा, कंपनी ही अपकमिंग इलेक्ट्रिक स्कूटर भारतात जून महिन्यापर्यंत लॉन्च केली जाऊ शकते. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्कूटरच्या लॉन्चिंगच्या तारखेवर परिणाम होऊ शकतो. कारण काही महत्वाच्या कम्पोनेंट्सचे सप्लाय कोरोनामुळे प्रभावित होऊ शकतो. अशातच ग्राहकांना स्कूटरसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते.(नवी C5 Aircross SUV ची भारतात डिलिव्हरी सुरु; खरेदीशिवाय तुम्हाला घरी घेऊन जाता येणार, जाणून घ्या कसे)
असे बोलले जात आहे की, EeVe Soul इलेक्ट्रिक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 130 किमी पर्यंत धावण्यास सक्षम आहे. जी स्कूटरची उत्तम रेंज आहे. कंपनीची ही स्कूटर एक हायस्पीड असल्याने याची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास असू शकते. जर परिस्थिती पूर्णपणे मार्गावर येत असल्यास भारतात ती लॉन्च केली जाऊ शकते. त्यानंतर कंपनीकडून त्याची डिलिव्हरी सुद्धा सुरु केली जाऊ शकते.