Citroen यांनी भारतात C5 Aircross SUV चे भारतात सुरु केले ट्रायल प्रोडक्शन

कंपनीकडून याचे अधिकृतरित्या लॉन्चिंग सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे कंपनीने लॉन्चिंग पुढे ढकलली आहे.

C5 Aircross SUV (Photo Credits-Twitter)

Citroën भारतीय बाजारात 2021 या वर्षाच्या सुरुवातीला C5 Aircross SUV सह एन्ट्री करणार आहे.  कंपनीकडून याचे अधिकृतरित्या लॉन्चिंग सप्टेंबर महिन्यात करण्यात येणार होते. परंतु कोरोना व्हायरसमुळे कंपनीने लॉन्चिंग पुढे  ढकलली आहे. कार निर्माता कंपनीने C5 Aircross चे तमिळनाडू मधील तिरुवल्लुर प्लांट येथे ट्रायल प्रोडक्शन सुरु केले आहे. ही भारतीय बाजारात Citroën पहिली गाडी असणार आहे. (Mahindra KUV100 NXT वर ग्राहकांना मिळणार तगडी सूट, पहा फिचर्ससह किंमत)

भारतीय बाजारात येणारी C5 Aircross बद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु कंपनी ती पेट्रोल आणि डिझेल इंजिनमध्ये उतवरणार आहे. पेट्रोल इंजिन 1.6 लीटर टर्बोचार्ज्ड मोटारसह येणार आहे. जी 180PS ची पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करतो. डिझेल इंजिन 2.0 लीटर युनिटसह येण्याची शक्यता आहे. जो 176 PS ची पॉवर आणि 400Nm टॉर्क जनरेट कणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजापात दोन्ही इंजिन एसयुव्ही मध्ये 8 स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येणार आहे. अशी आशा आहे की,  Citroën भारतीय बाजारात मॅन्युअल गिअरबॉक्ससह ऑटोमेटिकचा सुद्धा ऑप्शन दिला जाण्याची शक्यता आहे. (Hyundai कंपनीकडून Aura या मॉडेलवर देण्यात येणार तब्बल 20 हजारापर्यंत सूट, जाणून घ्या ऑफर्स)

C5 Aircross  मध्ये कंपनीने एक पॅनोरामिक सनरुफ, 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टिमसह अॅप्पल कारप्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटो, हैंड्स फ्री पार्किंग, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, डुअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि एक 12.3 इंचाचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर देणार आहे. सेफ्टी फिचर्ससाठी कंपनी यासाठी एअरबॅग्स, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर्स आणि हिल स्टार्ट असिस्ट देण्याची शक्यता आहे. भारतीय बाजारात आल्यानंतर या मिड-साइज एसयुव्हीची टक्कर Hyundai Tucson, Honda CR-V आणि  Jeep Compass  यांच्या टॉप वेरियंट्स सोबत होणार आहे. किंमतीबाबत बोलायचे झाल्यास याची अंदाजे एक्स शो रुम किंमत 20 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif