Car Buying Guide: नव्या कारच्या डिलिव्हरी पूर्वी जरुर तपासून पहा 'या' गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसानत

तर कारच्या शो रुम मध्ये गेल्यानंतर ही आपण आनंदात कार वरवर पाहतो. त्याचसोबत कार बद्दल माहिती देणारा व्यक्ती तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो आणि तुम्ही पेमेंट करता. पण तुम्ही स्वत:हून काही गोष्टी तपासून पहाता का?

(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

Car Buying Guide: एखादी नवी कार घेण्याचा उत्साह जरा अधिकच असतो. तर कारच्या शो रुम मध्ये गेल्यानंतर ही आपण आनंदात कार वरवर पाहतो. त्याचसोबत कार बद्दल माहिती देणारा व्यक्ती तुम्हाला सर्व गोष्टी सांगतो आणि तुम्ही पेमेंट करता. पण तुम्ही स्वत:हून काही गोष्टी तपासून पहाता का? कारण कारची घरी डिलिव्हरी झाल्यानंतर तुमच्या सोबत काही वेळेस फसवणूक ही केली जाऊ शकते. म्हणजेच कारच्या काही गोष्टींमध्ये डिफेक्ट असणे. यामुळे कारची डिलिव्हरी होण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी तपासून पहाणे अत्यावश्यक आहे.(ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी बूक सह वाहनांच्या कागदपत्रांची वैधता आता 31 मार्च 2021 पर्यंत ग्राह्य; Ministry of Road Transport & Highways ची माहिती)

नवी कार खरेदी करण्यापूर्वी त्याच्या सर्व स्विचकडे लक्ष द्या. तसेच प्रत्येक स्विच नीट कार्य करतो की नाही हे तपासून पहाणे सुद्धा विसरु नका. यामध्ये काही समस्या येत असल्यास त्वरीत डिलरला शो रुम मध्येच ती गोष्ट सांगा. कारमध्ये दिलेले प्रत्येक फिचर्सचा पेमेंट पूर्वी वापर करुन पहा. त्याचसोबत कारच्या सीटवर कोणतेही डाग नाहीत ना याची खात्री करुन घ्या.

तसेच जी कार पसंद केली आहे त्याची बॉडी योग्य पद्धतीने तपासा. त्याचसोबत कारचा रंग आणि डेंटवर ही लक्ष द्या. कारण काही वेळेस असे होते की, डिलर्सकडून आपल्याला काहीसा रंग निघालेला किंवा छोटासा पोक आलेली कार दिली जाते. डिलरिव्हरी करताना सुद्धा कारला स्क्रॅच जाऊ शकते. त्यामुळे आधीच डिलर कडून डिलिव्हरी बद्दल अधिक माहिती जाणून घ्या.(तुमचा वाहन परवाना  हरवला आहे? 'या' पद्धतीने तुम्हाला मिळवता येईल डुप्लिकेट Driving Licence)

कार खरेदी करण्याच्या प्रक्रियेतील मुख्य गोष्ट म्हणजे कारची डिलिव्हरी करताना त्यासोबत दिल्या जाणाऱ्या टूल्स आणि स्पेअर टायर स्टेपनी नक्की तपासून पहा. हे सुद्धा पहा की कारमध्ये रेंचसह अन्य महत्वाचे टूल्स व्यवस्थितरित्या आपल्या जागेवर आहेत की नाहीत. गाडीच्या हेडलाइट्स टेललाइट्स, इंडिकेटर्स लो बी, हाय बीम सर्व काही तपासून पहा. कारण गाडी एकदा घरी आल्यानंतर कोणती समस्या उद्भवू नये म्हणून या काही गोष्टी करणे अत्यंत गरेजेचे आहे. या व्यतिरिक्त कारचे टायर्स, कागदपत्र सुद्धा योग्य आहेत ना याची खात्री करुन घ्या.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif