5 लाख रुपयांच्या बजेटमध्ये खरेदी करा 'या' शानदार गाड्या, 1 लीटर पेट्रोलमध्ये कापणार 22km चे अंतर
Best Hatchback Cars Under 5 Lakh: भारतात आज वाहन खरेदी करण्यासाठी लोक प्रथम आपली सेगमेंट सेट करतात. देशात आजकाल सब कॉम्पॅक्ट एसयुवी सर्वांच्या पसंदीस पडत आहे. ऐवढेच नव्हे तर याच्या किंमती अगदी सहजपणे सर्वांच्या शिखाला परवडणाऱ्या असतात. त्यामुळे आम्ही तुम्हाला काही दमदार गाड्यांबद्दल माहिती देणार आहोतच. पण जर तुम्ही गाडी खरेदी करण्यासाठी 5 लाख रुपयांचे बजेट ठेवले असेल तर ही माहिती नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरणार आहे.(टाटा मोटर्स पुढील वर्षात Nexon EV पेक्षा कमी किंमतीतील दोन इलेक्ट्रिक कार करणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये 300km रेंज देणार)
Renault Kwid आपल्या सेगमेंट मधील सर्वाधिक विक्री केली जाणारी कार आहे. या कारची किंमत 3.32 लाख रुपये ते 5.48 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. या कारला पाच ट्रिम्स STD, RXE,RXL,RXT आणि Climber मध्ये विक्री केली जाते. जी दोन पेट्रोल इंजिनसह येते. या मॉडेलमध्ये एक 0.8 लीटर आणि दुसरा 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. जे 5 स्पीड मॅन्युअलसह 5 स्पीड एमटी आणि 5 स्पीड एएमटी दोन्हीचा ऑप्शन देते.
Datsun Redi-go सेटमेंट मधील दुसरी लोकप्रिय कार आहे. याची किंमत 3.38 लाख रुपये ते 4.95 लाख रुपये दरम्यान ठरण्यात आली आहे. ही कार सहा वेरियंट मध्ये उपलब्ध आहे. ही कार दोन इंजिनमध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यामध्ये एक 0.8 लीटर आणि दुसरा 1.0 लीटर पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. जे 5 स्पीड मॅन्युअलसह 5 स्पीड एममटीचा ऑप्शन मिळणार आहे. कंपनीने दावा केला आहे की, ही कार 20किमी ते 22 किमी मायलेज देणार आहे. याचे रियल लाइफ मायलेज 17 ते 20kmpl दरम्यान असणार आहे.(2021 BMW S1000R भारतात लॉन्च, दमदार इंजिनसह मिळणार हे मोठे डिझाइन अपडेट्स)
Maruti Celerio ची किंमत 4.65 लाख रुपये ते 5.90 लाख रुपये आहे. ही कार तीन ट्रिम्स LXi, VXi आणि ZXi मध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये इंजिन 1.0 लीटर तीन सिलेंडर पेट्रोलचे ऑप्शन मिळणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी यावर CNG चा ही ऑप्शन देणार आहे. या कारचे मायलेज पेट्रोलवर 21.63 किमी/लीटर आणि सीएनजी वर 30.47 किमी/किलोग्रॅम आहे.