Bajaj Avenger Street 160 च्या किंमतीत वाढ, जाणुन घ्या फिचर्स
बजाज कंपनीने भारतीय बाजारात Bajaj Avenger Street 160 ची किंमतीत घट केली आहे. त्यामुळे या बाईकमध्ये काय खासियत आहे याबद्दल आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत. बाइकच्या पॉवर आणि स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास बजाज अॅव्हेंजर स्ट्रिट 160 मध्ये 160cc द्विन स्पार्क, 2 वेल्व, एअर कूल्ड DTS-i इंजिन दिले गेले आहे. जी 8500Rpm वर 14.8bhp ची पॉवर आणि 7000Rpm वर 13.5Nm वर टॉर्क जनरेट करणार आहे.(Compact Suv खरेदी करण्याचा विचार करत असल्यास Nissan देणार Kicks वर भारी डिस्काउंट)
डायमेंशन बद्दल बोलायचे झाल्यास Bajaj Avenger Street 160 ची लांबी 2210 mm, रुंदी 806mm, उंची 1070mm, व्हिलबेस 1480mm, ग्राउंड क्लिअरेंस 177mm, एकूण वजन 150 किलो लीटरची क्षमतेचा फ्यूल टँक दिला आहे.(Benelli ची दमदार बाइक Imperiale 400 वर दिली जातेय खास ऑफर; 4999 रुपये देऊन घरी आणा, 'या' पद्धतीने करा बुक)
ब्रेकिंग सिस्टिमच्या प्रकरणी Bajaj Avenger Street 160 मध्ये फ्रंट 260mm डिस्क ब्रेक आणि रियर मध्ये 130mm ड्रम ब्रेक दिला आहे. तर सस्पेंशनसाठी Avenger Street 160 च्या फ्रंटला 130mm फोर्क ट्रॅव्हलसह टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि रियरमध्ये द्विन शॉक्स सस्पेंशन दिले गेले आहे. स्टाइल बद्दल सांगायचे झाल्यास या बाइकमध्ये स्ट्रिट कंट्रोल हँडलबार, स्पोर्टी पिलियन बॅकरेस्ट, ब्लॅक अलॉय व्हिल्स दिले आहेत. Ebony black आणि Spicy Red कलरच्या वेरियंटमध्ये ही उपलब्ध आहे.किंमतीबद्दल सांगायचे झाल्यास Bajaj Avenger Street 160 ची किंमत आता 1 लाख रुपयांहून अधिक आहे. या बाईकची सुरुवाती एक्स शोरुम किंमत 1,01,094 रुपये आहे.
याआधी बजाज कंपनीने चेतक इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च केली होती. याची सुरुवाती किंमत 1 लाख रुपये आहे. ही स्कुटर दोन वेरियंट मध्ये ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक चेतक एकदा फुल चार्ज केल्यानंतर 95 किमी धावणार आहे.रेट्रो-मॉर्डन लुक असलेली ही स्कुटर प्रिमियम पद्धतीची दिसून येत आहे. चेतकची ही स्कुटर 1 लाख रुपयांपासून सुरु असून त्याच्या प्रिमियअम अॅडिशनसाठी 1.15 लाख रुपये ग्राहकांना मोजावे लागणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)