Audi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

सध्या जर्मनीत या कारची किंमत सुमारे 38 लाख रुपयांपासून सुरू होईल.

Audi Q4 e-tron (PC - Twitter)

Audi Electric Car: जर्मन वाहन निर्माता कंपनी ऑडीने आपली Q4 e-tron आणि Q4 e-tron Sportback कार सादर केली आहे. कंपनीने या इलेक्ट्रिक कार 2019 च्या जिनिव्हा मोटर शोमध्ये सादर केल्या होत्या. या कार या वर्षाच्या अखेरीस युरोपियन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनीने Q4 ई-ट्रॉन आणि Q4 ई-ट्रॉन स्पोर्टबॅक Q4 35 e-tron, Q4 40 e-tron आणि Q4 50 e-tron Quattro या तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे. ज्यामध्ये एंट्री-लेव्हल Q4 35 e-tron मध्ये 52 kWh बॅटरी पॅक वापरला गेला आहे. जी 310 एनएम टॉर्कसह 168 बीएचपीची पावर देते.

तसेच Q4 40 e-tron मध्ये 77 केडब्ल्यूएचची बॅटरी पॅक आहे. जो 310 मिमी टॉर्कसह 201 बीएचपीची पावर देतो. तसेच Q4 50 e-tron Quattro मध्ये 77 किलोवॅट क्षमतेचा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. जो 295 बीएचपी पॉवर आणि 460 एनएम टॉर्क जनरेट करतो. (वाचा - नवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट)

ड्रायव्हिंग रेंजबद्दल बोलायचं झालं तर, ऑडीने त्याचे बेस व्हेरियंट Q4 35 ई-ट्रॉन 341 किमी ड्राईव्हिंग रेंज देते, तर Q4 40 ई-ट्रॉन आणि Q4 50 ई-ट्रॉनमध्ये अनुक्रमे 520 किमी ते 497 किमी ची ड्राईव्हिंग रेज देण्यात आली आहे. कारच्या रेंज-टॉपिंग व्हेरिएंटला 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग गती निश्चित करण्यासाठी 6.2 सेकंद लागतात, तर त्याची टॉप स्पीड 180kph आहे.

दरम्यान, ऑडी Q4 ई-ट्रॉन काही महिन्यांत युरोपमध्ये दाखल होणार आहे. सध्या जर्मनीत या कारची किंमत सुमारे 38 लाख रुपयांपासून सुरू होईल. तथापि या किंमतीत सध्या कोणताही कर समाविष्ट केलेला नाही.



संबंधित बातम्या

Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024 Live Streaming: दुसऱ्या वनडेत श्रीलंकेला कडवी झुंज देण्यासाठी न्यूझीलंडचा संघ सज्ज, इथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा कधी, कुठे आणि कसा घेणार आनंद

Sri Lanka vs New Zealand 2nd ODI 2024 Preview: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आज श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात होणार लढत, सामन्यापूर्वी हेड टू हेड आणि लाइव्ह स्ट्रीमिंगसह जाणून घ्या संपूर्ण माहिती

SL vs NZ 2nd ODI Key Players To Watch Out: श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार दुसरा एकदिवसीय सामना, सर्वांच्या नजरा असतील 'या' दिग्गज खेळाडूंवर

New Zealand vs England Test Series 2024 Full Schedule: न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला 'या' दिवसापासून होणार सुरुवात, येथे जाणून घ्या मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक