Sex चा साहसी प्रयोग बेतला जोडप्याच्या जीवावर, गळा दाबल्याने तरुणीचा गुदमरून मृत्यू
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: iStock)

काही लोकांची सेक्स करताना ठराविक पद्धतीने किंवा साहसी पद्धतीने तो केला जावा अशी फँटसी असते. हीच फँटसी कुणा कपलला महागात पडलीय. ही पद्धत त्या कपलला इतकी महागात पडली की त्यात तरुणीचा गुदमरुन मृत्यू झाला आहे. न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरामधील ही घटना असून यात सेक्स करणा-या कपलमध्ये तरुणीचा गळा घोटला गेल्याने तिचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी तिच्या मित्राला न्यायालयाने 17 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे या दोघांची ओळख ऑनलाईन डेंटिंग साइट टिंडरवर झाली होती.

ग्रेस असे या मृत तरुणीचे नाव आहे. ही मूळची लंडनची असून ती एका दौ-यादरम्यान न्यूझीलंडला आली होती. ती महिनाभर तेथे राहणार होती. याचवेळी टिंडरवरुन तिची एका तरुणाशी ओळख झाली. शारीरिक संबंधावेळी करू नका या चुका, नाहीतर पत्नी होऊ शकते नाराज

ग्रेसच्या वाढदिवसानिमित्त त्या दोघांनी पहिल्यांदा भेटण्याचा निर्णय घेतला. एकमेकांना भेटल्यानंतर त्यांनी सेक्स करण्याचा निर्णय घेतला. मात्र सेक्स दरम्यान त्यांना काही साहसी प्रकार करावेसे वाटले. अशा वेळी ते करत असताना अचानक ग्रेसचा आरोपीकडून गळा दाबला गेला. त्यात ग्रेसचा गुदमरून मृत्यू झाला. ही गोष्ट दोघांसाठी अनपेक्षित होती.

याप्रकरणी पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली. ही हत्या नसून दुर्घटना असली तरीही हा गुन्हाच आहे. म्हणून न्यायालयाने या तुरणाला 17 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

काही महिन्यांपूर्वी नालासोपा-यात (Nalasopara) अशीच एक धक्कादायक घटना आहे. ज्यात एका तरुणाने तिच्याच सोसायटीत राहणा-या 14 वर्षांच्या मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मटाने दिलेल्या बातमीनुसार, तिच्याकडे शारीरिक सुखाची मागणी केली असता तिने नकार दिल्या कारणाने या तरुणाने तिचे डोके भिंतीवर आदळले. यात ती मुलगी गंभीररित्या जखमी झाली होती.