World's Largest Snake Found Dead: ॲना ज्युलिया नावाचा जगातील सर्वात मोठा साप Amazon Rainforest मध्ये मृतावस्थेत सापडला
दक्षिण ब्राझीलच्या मातो ग्रोसो डो सुल राज्याच्या दुर्गम भागात त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. ॲना ज्युलिया ( Ana Julia Found Dead) नावाचा हा साप पाच आठवड्यांपूर्वी फॉर्मोसो नदीत पोहताना आढळून आला होता.
Largest Green Anaconda Found Dead: जगातील सर्वात मोठा साप अशी ओळख असलेला महाकाय आणि दुर्मिळ ॲनाकोंडा मृतावस्थेत (World's Largest Snake Found Dead) आढळला आहे. दक्षिण ब्राझीलच्या मातो ग्रोसो डो सुल राज्याच्या दुर्गम भागात त्याचा मृत्यू झाल्याचे पुढे आले. ॲना ज्युलिया ( Ana Julia Found Dead) नावाचा हा साप पाच आठवड्यांपूर्वी फॉर्मोसो नदीत पोहताना आढळून आला होता. ज्यामुळे जगभरातील संधोधक आणि पर्यावरणप्रेमी तसेच सर्पमित्रांना आश्चर्याचा धक्का बसला होता. इतका महाकाय साप अभ्यासकांच्या दृष्टीकोणातून सुटलाच कसा? यासोबतच सृष्टीतील जीवांचा शोध अद्यापही पूर्णपणे लागला नाही, यावर पुन्हा एकदा अभ्यासकांचे एकमत झाले होते. दरम्यान, या सापाच्या गूढ मृत्यूबाबत आणि त्याच्या कारणाविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सापाच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्याबाब अद्याप अधिकृत पुष्टी झाली नाही.
नॅशनल जिओग्राफिक डिस्ने+ मालिका 'पोल टू पोल' या प्रसिद्ध अभिनेता विल स्मिथच्या चित्रीकरणादरम्यान ॲना ज्युलिया ॲनाकोंडाचा अचानक शोध लागला. तब्बल 26 फूट लांबीचा आणि अंदाजे 440 पौंड वजनाचा हा उत्तरेकडील हिरवा ॲनाकोंडा भलताच मोठा होता. त्याचे डोके माणसाच्या डोक्याएवढे मोठे आणि तितकेच मजबूत होते. आतापर्यंत आढळलेल्या सर्प पर्जातीतील अपवादात्मक सांपांचेच डोके अशा प्रकारे आढळले आहे. (हेही वाचा, New Species of Anaconda: ग्रीन ॲनाकोंडा, ॲमेझॉनच्या जंगलात आढळली जगातील सर्वात मोठ्या सापाची प्रजाती)
इन्स्टाग्राम पोस्ट
प्राथमिक माहितीनुसार, सापाचा मृत्यू बंदुकीतून झाडल्या गेलेल्या गोळीमुळे झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप ठोस असा कोणताच पुरावा पुढे आला नाही. सापाच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्यात आघाडीवर असलेले डच संशोधक प्रोफेसर फ्रीक वॉन्क यांनी जोर देत सांगितले की, तपास अद्याप सुरू आहे. प्रोफेसर वोंक यांनी इंस्टाग्रामवर अना ज्युलियाच्या मृत्यूबाबत माहिती दिली. त्यांनी या प्रदेशातील जैवविविधतेसाठी आवश्यक असलेला प्राणी आपण गमावल्याची भावना व्यक्त केली. इंडिपेंडंटने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, Viral Video: बर्फातून तयार केला विशाल अॅनाकोंडा, व्हिडिओ पाहून साप खरा की खोटा यावर विश्वास बसणार नाही)
सापाला गोळ्या घालून ठार केल्याचा दावा केला जात असला तरी, त्याबाबत अद्याप ठोस पुरावे सापडले नसल्याचे प्रोफेसर वोंक यांनी म्हटले आहे.सापाच्या मृत्यूच्या नैसर्गिक कारणांच्या संभाव्यतेसह सर्व शक्यतांचा विचार करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
ॲना ज्युलिया नावाचा 26 फूट लांब अॅनाकोंडा साप ब्राझीलच्या ॲमेझॉनमधील नदीजवळ मृतावस्थेत आढळून आल्याने सर्पमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. एका डच संशोधकाचा स्केल्ड ब्युटीसह पोहण्याचा व्हिडिओ काही आठवड्यांपूर्वीच व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये हा महाकाय साप पाण्यात पोहताना आढळून आला होता. जगातील सर्वात दुर्मिळ आणि तितकाच मोठा साप असल्याने त्याच्या मृत्यूबाबत जगभरातून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.