Indonesia: ट्रेडमिलवर व्यायाम करताना महिला अचानक तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली, उपचारा दरम्यान मृत्यू (Watch Video)
ही घटना इंडोनिशयातील पोंटियानाक येथील आहे.
Indonesia: जिममध्ये (Gym) व्यायाम करताना एका महिलेने आपला जीव गमावला आहे. ही घटना इंडोनिशयातील पोंटियानाक येथील आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद झाली आहे. घटनेचे फुटेज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इमारतीमध्ये असलेल्या जीममध्ये व्यायाम करणं हे धोकादायक ठरू शकत. या घटनेनंतर परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. (हेही वाचा- अग्नीतांडव! दक्षिण कोरियामध्ये लिथियम बॅटरी प्लांटला भीषण आग; 21 जणांचा मृत्यू )
मिळालेल्या माहितीनुसार, महिला 18 जून रोजी जिममध्ये गेली. नेहमी प्रमाणे महिला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ट्रेडमिलवर व्यायाम करत होती. महिला सुमारे ३० मिनिटे व्यायाम करतो होती. ट्रेडमिलमधून उतरताच दोन पावले मागे जाते आणि थेट खिडकीतून बाहेर पडते. महिला स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करते परंतु ती वाचू शकली नाही. खिडकी उघडी असल्याने महिला जमिनीवर कोसळली.
इमारतीवरून खाली पडल्यानंतर जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि डोक्याला दुखापत झाल्याने रक्तस्त्राव होत होता. गंभीर दुखापतीमुळे महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. वापरकर्त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेला जिम ट्रेनर घटनेच्या वेळी उपस्थित नव्हता, असेही वृत्त आहे. जीम ट्रेनर ब्रेकवर असताना महिला खिडकीतून खाली पडली. पोलिस या संदर्भात चौकशी तपासणी करत आहे.