फसवणूक! महिलेने ऑनलाईन मागवला दीड लाखाचा iPhone 13 Pro Max; बॉक्समध्ये मिळाला हात धुण्याचा साबण
महिलेने तक्रार केल्यावर तिला सांगण्यात आले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, परंतु अद्यापपर्यंत तिला आयफोन 13 मिळालेला नाही. महिलेने सांगितले की, ही डिलिव्हरी बॉयची चूक असल्याचे दिसते
ऑनलाइन शॉपिंगमध्ये (Online Shopping) फसवणूक होणे आजकाल एक सामान्य गोष्ट झाली आहे. दररोज अनेक साईट्सद्वारे ग्राहकांची विविध मार्गांनी फसवणूक होत असते. ऑनलाइन शॉपिंगमध्ये केवळ भारतातच लोकांना चुकीची उत्पादने मिळतात असे नाही, तर इतर देशांमध्येही हीच परिस्थिती आहे. ताजे प्रकरण ब्रिटनमधील आहे, जिथे एका महिलेने सुमारे 1.5 लाख रुपयांचा आयफोन 13 प्रो मॅक्स (iPhone 13 Pro Max) ऑनलाइन ऑर्डर केला होता, परंतु जेव्हा डिलिव्हरी बॉक्स उघडला तेव्हा महिलेला 75 रुपये किमतीचा साबण (Hand Soap) मिळाला.
काही महिन्यांपूर्वी भारतातही असाच प्रकार घडला होता. कर्नाटकातील एका व्यक्तीने आयफोन 12 ऑनलाइन ऑर्डर केला होता पण त्याला 5 रुपये किमतीचा साबण देण्यात आला. अहवालानुसार, Khaoula Lafhaily नावाच्या महिलेने एका सुप्रसिद्ध साइटवरून iPhone 13 Pro Max ची ऑर्डर दिली होती, परंतु तिला हँड सोप रिफिलची बाटली मिळाली ज्याची किंमत फक्त $1 आहे. महिलेने हा फोन ईएमआयवर खरेदी केला होता, त्यानंतर फोनची किंमत दीड लाखांवर गेली होती.
रिपोर्टनुसार, या आयफोनची डिलिव्हरी खरेदीच्या दुसऱ्याच दिवशी होणार होती, पण डिलिव्हरी दोन दिवसांनी झाली. डिलिव्हरी बॉयने महिलेला सांगितले होते की, तो ट्रॅफिकमध्ये अडकला आहे, त्यामुळे दोन दिवसांनी डिलिव्हरी होईल.
महिलेचा दावा आहे की डिलिव्हरी बॉयने घरी पॅकेज दिले नाही. त्याने फक्त घराच्या दरवाजाचा फोटो काढला आणि अॅपमध्ये अपडेट केले की महिला त्यावेळी घरी नाही. परंतु महिलेने सांगितले की ती त्यावेळी घरीच होती. हा बॉक्स नंतर महिलेला दुसर्या कोणीतरी दिला, जो उघडल्यावर हात धुण्याचा साबण रिफिलची बाटली सापडली. (हेही वाचा: लोकप्रिय कंपनी Johnson and Johnson च्या बेबी पावडरवर जगभरात घातली जाऊ शकते बंदी, जाणून घ्या काय आहे कारण)
महिलेने तक्रार केल्यावर तिला सांगण्यात आले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, परंतु अद्यापपर्यंत तिला आयफोन 13 मिळालेला नाही. महिलेने सांगितले की, ही डिलिव्हरी बॉयची चूक असल्याचे दिसते आणि त्याच व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी आयफोन चोरला.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)