William Shakespeare, युके मध्ये Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine घेणार्या पहिल्या पुरूषाचं 81 व्या वर्षी निधन
ज्या हॉस्पिटल मध्ये विल्यम शेक्सपियर यांना लस देण्यात आली त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी 20 मे ला अखेरचा श्वास घेतला.
जगात Pfizer-BioNTech Covid-19 Vaccine चा डोस घेणारी जगातील दुसरी व्यक्ती William Shakespeare यांचे 20 मे दिवशी निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. दरम्यान त्यांचे निधन कोविड 19 ने झाले नसून इतर आजारपणामुळे आहे. दरम्यान 8 डिसेंबर दिवशी या वयोवृद्ध व्यक्तीने पहिला डोस घेतल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची चर्चा झाली होती. त्यांना हा डोस University Hospital Coventry मध्ये देण्यात आला होता. पहिला डोस 90 वर्षीय ब्रिटीश महिला Margaret Keenan यांना दिली होती. (नक्की वाचा: Margaret Keenan, 90 वर्षीय आजीबाई ठरल्या UK मधील Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine चा डोस घेणार्या पहिल्या व्यक्ती Watch Video).
दरम्यान ज्या हॉस्पिटल मध्ये विल्यम शेक्सपियर यांना लस देण्यात आली त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते रॉल्स रॉयल्स मध्ये parish councillor म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात आता पत्नी, 2 मुलं आणि नातवडं असा परिवार आहे. Coventry councillor Jayne Innes,आणि शेक्सपियर यांचे मित्र यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करत बिल त्यांच्या खटाळवृत्ती साठी लक्षात राहतील असं म्हणाले आहेत. तसेच त्याला सर्वात चांगली श्रद्धांजली म्हणजे उरलेल्या नागरिकांनी लसीकरणासाठी पुढे यावं. Fact Check: कोरोना लस घेतल्यानंतर 2 वर्षात मृत्यू होणार असल्याचा फ्रांसचे नोबल पुरस्कार विजेते Luc Montagnier यांचा दावा? PIB ने उघडकीस आणले सत्य.
श्रद्धांजली
BBC ला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये बिल यांच्या पत्नींनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्या म्हणतात-' William Shakespeare हुशार फोटोग्राफर आणि संगीतप्रेमी होता. जॅझ गाणी त्याला फार आवडत असे. सगळ्यात खास म्हणजे तो एक चांगला पती, वडील आणि आजोबा होता. त्यांची नातवंडं Pop Pops म्हणून त्यांना हाक मारत असे. William Shakespeare ला जे जे ओळखत होते ते ते त्याला नक्कीच मिस करणार आहेत. त्या प्रत्येकावरच विल्यमची छाप राहील.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)