When Will Coronavirus End: कोरोना व्हायरसचे संकट कधी संपणार? WHO च्या प्रमुखांनी दिले 'हे' उत्तर
यावर जागतिक आरोग्य संघटनने उत्तर दिले आहे.
भारतासह जगभरातील अनेक देश कोरोना व्हायरस संकटाचा (Coronavirus Pandemic) सामना करत आहेत. सातत्याने वाढणारी कोरोना बाधिातांची संख्या, मृतांचा आकडा यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना व्हायरसचे आरोग्य संकट आर्थिक संकटही सोबत घेऊन आले आहे. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली असून व्यवसायात मंदी सुरु आहे. त्याचबरोबर दैनंदिन जीवनातही अनेक बंधनं निर्माण झाली आहेत. अद्याप कोविड-19 (COVID-19) वर लस (Coronavirus Vaccine) उपलब्ध न झाल्याने कोरोनाचे संकट कधी संपणार असा प्रश्न सर्वांच्याच मनात उपस्थित झाला आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनने (World Health Organization) उत्तर दिले आहे. 2 वर्षात कोरोना व्हायरसचे संकट संपेल, अशी आशा असल्याचे WHO ने म्हटले आहे.
कोविड-19 स्पॅनिश फ्लू पेक्षा कमी वेळात नष्ट होईल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. दरम्यान 2 वर्षांपेक्षा कमी वेळात कोरोना व्हायरसचे संकट संपेल, असे WHO चीफ टेडरोस अधानोम घेब्रेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी मीडियाशी बोलताना सांगितले. (Coronavirus Update: देशात 24 तासात नवे 69,878 कोरोना रुग्ण; एकुण 29,75,702 कोरोनाग्रस्तांपैकी अॅक्टिव्ह, डिस्चार्ज व मृत रुग्ण किती पाहा)
याबद्दल अधिक बोलताना WHO चे चीफ म्हणाले, "1918 साली आलेल्या महामारी पेक्षा कमी वेळात कोरोना व्हायरसचे संकट संपेल." 1918 साली आलेल्या महामारी पेक्षा कोविड-19 च्या संकटात जगभरातील सर्वच देशांकडून तुलनेने जलद गतीने पाऊलं उचलली जात आहेत. यासाठी सध्या उपलब्ध असलेली टेकनॉलॉजीचा अधिक फायदा होत असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 29 लाखांवर पोहचला आहे. तर 55 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 697330 इतके अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. तर 2222577 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.