IPL Auction 2025 Live

परदेशी दौऱ्यावेळी Vladimir Putin यांचे 'मल-मूत्र' केले जाते गोळा; खास बॉक्समधून पाठवले जाते रशियाला, जाणून घ्या कारण

त्यामुळे दररोज त्याच्या स्टूलची तपासणी करून त्याच्या तब्येतीत कुठली गडबड तर नाही ना याची खातरजमा केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत चाचणीचा अहवाल कोणालाही मिळू नये, याचीही काळजी घेतली जाते

Vladimir Putin | (Photo Credits: Wikimedia Commons)

सध्या विज्ञान इतके प्रगत झाले आहे की लोकांबद्दलची बरीच माहिती त्यांच्या डीएनए (DNA) मधून काढता येऊ शकते. म्हणूनच जगातील बडे नेते आपला डीएनए नमुना शत्रू देशांच्या हाती न लागण्याची काळजी घेत असतात. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काही महिन्यांपूर्वी पुतीन यांची भेट घेतली होती, तेव्हा त्यांनाही आपला डीएनएचा नमुना रशियाकडे जाईल याची भीती वाटत होती. म्हणूनच त्यांनी त्यांची कोविड चाचणी करून घेतली नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीनही (Vladimir Putin) आपल्या डीएनए नमुन्यांबाबत अत्यंत सावध आहेत.

पुतीन आपल्या डीएनएसोबतच आपली इतर कोणतीही गोष्ट शत्रू देशांना देऊ इच्छित नाहीत, ज्याद्वारे त्यांच्या आरोग्याची माहिती मिळू शकेल. याच कारणामुळे पुतीन यांच्या परदेश दौऱ्यावेळी त्यांचे अंगरक्षक पुतिन यांचे मल-मूत्रही गोळा करतात. या गोष्टी एका बॉक्समध्ये बंद करून मॉस्कोला परत आणल्या जातात. एका अहवालानुसार, पुतिनच्या सुरक्षा सेवेचे सदस्य त्यांचे मल-मूत्र एका विशेष पॅकेटद्वारे गोळा करतात. नंतर ते एका ब्रीफकेसमध्ये ठेवले जाते.

पत्रकार रेगिस जँते यांच्या फ्रेंच वृत्तपत्रिकेने पुतीन यांच्या या कृतीबद्दल खुलासा केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, पुतिनचे मलमूत्र गोळा करण्यासाठी फेडरल प्रोटेक्टिव्ह सर्व्हिसचे खास एजंट आहेत. प्रत्येक वेळी पुतिन यांचे मलमूत्र गोळा करून एका खास पिशवीत ठेवणे आणि सुटकेसमधून ते रशियाला पाठवणे हे त्यांचे काम आहे. यासोबतच या अंगरक्षकांच्या जबाबदारीत पुतिन यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या शरीराची काळजी घेणे देखील समाविष्ट आहे. (हेही वाचा: कर्करोग बरा होतो, इतिहासात प्रथमच औषध चाचणीला यश? वैद्यकीय क्षेत्रात खळबळ)

पुतिन यांच्या प्रकृतीबाबत त्यांची सुरक्षा एजन्सी अत्यंत सतर्क आहे. त्यामुळे दररोज त्याच्या स्टूलची तपासणी करून त्याच्या तब्येतीत कुठली गडबड तर नाही ना याची खातरजमा केली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत चाचणीचा अहवाल कोणालाही मिळू नये, याचीही काळजी घेतली जाते. पत्रकाराचा दावा आहे की त्याला या गुप्तचर क्रियाकलापाची माहिती 2019 मध्ये मिळाली. पुतीन त्यावेळी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते. यानंतर पत्रकाराने या प्रकरणी चौकशी केली असता, 2017 मध्ये फ्रान्स दौऱ्यावर असतानाही त्यांचे अंगरक्षक त्यांच्यासोबत बाथरूममध्ये जात असल्याचे आढळून आले. दरम्यान याआधी पुतीन यांच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल अनेक डावे केले गेले आहेत. पुतीन यांना कॅन्सर आणि पार्किन्सन्सचा आजार आहे जो आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचेही सांगण्यात आले होते.