IPL Auction 2025 Live

Vladimir Putin And Kim Jong Un Car Incident: आगोदर कोण? व्लादिमीर पुतीन आणि किम जोंग उन यांच्या भेटीदरम्यान घडला मजेशीर प्रसंग, (Watch Video)

आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या एकूण 24 वर्षांतील एकूण कारकीर्दीमध्ये त्यांची ही पहिली आणि ऐतिहासिक भेट आहे. या भेटीदरम्यान उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग उन (Kim Jong-Un) यांनी प्योंगयांगमधील सुनान आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतीन (Putin) यांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले.

Vladimir Putin And Kim Jong | (Photo credit: archived, edited, representative image)

Vladimir Putin North Korea Visit: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या एकूण 24 वर्षांतील एकूण कारकीर्दीमध्ये त्यांची ही पहिली आणि ऐतिहासिक भेट आहे. या भेटीदरम्यान उत्तर कोरियाचे राष्ट्रप्रमुख किम जोंग उन (Kim Jong-Un) यांनी प्योंगयांगमधील सुनान आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुतीन (Putin) यांचे वैयक्तिकरित्या स्वागत केले. उभय देशांच्या राजनैतिक संबंधांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे पुतीन आणि किम जोंग यांनी या भेटीवेळी परस्परांना मिठीदेखील मारली. या भेटीदरम्यानचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पहिले कोण? राष्ट्राध्यक्षांमध्ये मजेशीर प्रसंग

पुतीन आणि किम जोंग उन यांच्या भेटीदरम्यानच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, व्लादिमीर पुतीन हे किम जोंग यांना आपल्या कारमधून सोबत येण्याचे अवाहन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला किम जोंग त्यांना आपल्या कारने पुढे चलण्याचे अवाहन करत आहेत. ही घटना पाहून सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. दक्षिण कोरियामध्ये घडलेला हा प्रसंग अनेकांना उभय नेत्यांमध्ये असलेला परस्परांविषयीचा आदरभाव वाटला तर काहींनी परस्परांवर विश्वास नसल्यानेच दोन्ही नेते अशा पद्धीचे वर्तन करताना दिसल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, अमेरिका भारतीय लोकसभा निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा रशियाचा दावा)

व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, स्पुतनिकने या प्रसंगादरम्यानचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, "तुमच्या आदरातिथ्याबद्दल आणि तुमच्या वेळेबद्दल तुमचे खूप खूप आभार." नोंदवलेल्या उपग्रह प्रतिमेनुसार पुतिन यांची भेट सप्टेंबरमध्ये किम जोंग उन यांच्या रशियाच्या दौऱ्यानंतर झाली. ज्यामुळे दोन्ही देशांमधील शस्त्रास्त्र हस्तांतरणात लक्षणीय वाढ झाली. या भेटीदरम्यान, नेते द्विपक्षीय चर्चा करणार आहेत, ज्यात वन-ऑन-वन ​​चर्चेचा समावेश आहे आणि सुरक्षा आणि आर्थिक सहकार्यावरील करारांवर स्वाक्षरी केली जाण्याची अपेक्षा आहे. या चर्चेनंतर, पुतीन यांच्या परराष्ट्र धोरण सहाय्यकाचा हवाला देऊन इंटरफॅक्स वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, दोन्ही नेते प्रेस स्टेटमेंट्स देतील. (हेही वाचा, North Korea Vs South Korea: उत्तर कोरियाकडून दक्षिण कोरियाशी संबंध सुधारणा समिती रद्द, युद्धखोरीच्या भाषेसह 'शत्रू क्रमांक एक' म्हणून उल्लेख)

व्हिडिओ

व्हिडिओ

व्हिडिओ

व्हिडिओ

भेटीबद्दल जगभरात कुतुहल

क्रेमलिनने जाहीर केले आहे की पुतिन किम यांच्याशी चर्चा संपवून बुधवारी संध्याकाळी व्हिएतनामचा प्रवास करून आपला राजनैतिक दौरा सुरू ठेवतील. दरम्यान, या भेटीचे जगभरातील देशांमध्ये पडसाद उमटतील. आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या मते ही भेत केवळ राजनैतिक समजावी अशी साधी भेट नव्हे. किम जोंग उन हे आपल्या देशातील हुकुमशाहीसाठी ओळखले जातात. तर दुसऱ्या बाजूला, व्लादिमीर पुतीन हे रशियामध्ये एकचालुकानुवर्ती पद्धतीबद्दल ओळखले जातात. अनेकदा ते आपल्या विरोधकांना लैकिकरित्या तर कधी शारीरिकरित्या गायब करतात आणि आपल्यासमोर विरोधकच राहणार नाही याची दक्षता घेतात, असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.