US Shocker: लहान मुलांसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न करणाऱ्या Disney World मधील 3 कर्मचाऱ्यांना अटक
अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यात असलेल्या डिज्नी वर्ल्ड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डिज्नी वर्ल्ड मधील 3 कर्मचाऱ्यांनी लहान मुलांसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे.
अमेरिकेतील (United States) फ्लोरिडा (Florida) राज्यात असलेल्या डिज्नी वर्ल्ड (Disney World) मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. डिज्नी वर्ल्ड मधील 3 कर्मचाऱ्यांनी लहान मुलांसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. यानंतर त्या तिघांना अटक करण्यात आली आहे. Polk County मधील काही एजन्सीने मिळून ऑपरेशन चाईल्ड प्रोटेक्ट नावाचे स्टिंग ऑपरेशन सुरु केले होते. 6 दिवस चाललेल्या या स्टिंग ऑपरेशननंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे. या डिज्नी वर्ल्डच्या 3 कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अजून 14 विविध व्यक्तींना लहान मुलांशी सेक्स करण्याच्या आरोपाखली अटक करण्यात आली आहे. (Sex In Car: धक्कादायक! कारमध्ये सेक्स करणे जीवावर बेतले; लैंगिक संबंध ठेवताना 15 वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु)
अटक झालेल्या व्यक्तींपैकी एका व्यक्तीचे नाव Savannah McGrew (29) तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव Jonathan McGrew (34) असे आहे. या दाम्पत्याने एका 13 वर्षीय मुलीसोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी त्यांना अटक करण्यात आली तेव्हा ते सुट्टीवर होते. हे दाम्पत्य डिज्नी वर्ल्ड मधील हॉलिवूड स्टुडिओत काम करत होते, अशी माहिती Polk County चे Sheriff Grady Judd यांनी दिली.
अटक केलेल्यांपैकी तिसऱ्या आरोपीचे नाव Kenneth Javier Aquino असे असून तो डिज्नी अॅनिमल किंगडममध्ये लाईफगार्डचे काम करतो. Kenneth आणि त्याच्या गर्भवती प्रेयसीने एका लहान मुलासोबत सेक्स करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी HIV पॉझिटीव्ह असल्याचे Sheriff Grady Judd यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, ही घटना अतिशय लज्जास्पद आहे. यांनी केलेले कृत्य आपण शब्दांत मांडू शकत नाही. आम्हाला मिळालेल्या फोटोज आणि व्हिडिओज आम्ही शेअर करु शकत नाही. अटक झालेल्या 17 जणांपैकी 9 जणांना गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)