US Presidential Election: अमेरिका राष्ट्राध्यक्ष पद निवडणुकीत 'द रॉक'ची एण्ट्री? 46% अमेरिकनांचा Dwayne Johnson यांना पाठिंबा
या प्रश्नाच्या उत्तरार्थ जवळपास 46% नागरिकांनी द रॉक यांना पसंती दर्शवल्याचे पुढे आले आहे.
'द रॉक' (The Rock) नावाने प्रसिद्ध असलेला WWE रेसलर, जगप्रसिद्ध हॉलिवूड अॅक्टर ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson) यूए प्रेसिडेन्शिअल इलेक्शन 2024 (US Presidential Election 2024) लढविण्याची शक्यता आहे. अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदासाठी होणाऱ्या आगामी निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदाचा उमेदार म्हणून आपण कोणाला प्राधान्य द्याल असा सवाल अमेरिकन नागरिकांना विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरार्थ जवळपास 46% नागरिकांनी द रॉक यांना पसंती दर्शवल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे लोकांच्या पाठिंब्याचा ओघ 2024 पर्यंत असाच कायम राहिला तर पडद्यावर अधिराज्य जागवणारा हा अभितेना 'द रॉक' अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उडी घेऊ शकतो, अशी चर्चा आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी याबाबत एक वृत्त दिले आहे.
स्वत: ड्वेन जॉनसन यांनी या सर्वेबाबत आणि लोकांच्या पाठिंब्याबाबत आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर म्हटले आहे की, 'अत्यंत आनंददायी. मला नाही वाटत की आमच्या संस्थापक सदस्यांनी असा कधी विचार केला असेल की, सहा फूट 4 इंच उंचीचा, टकला, अंगावर टॅटू गोंदवणारा एक अर्धा कृष्णवर्णीय, अर्धा समाओ, टकीला (tequila) पिणारा व्यक्तीही त्यांच्या क्लबमध्ये सहभागी होऊ शकतो. परंतू, खरोखरच असे घडले तर आपली लोकांची सेवा करताना मला प्रचंड आनंद होईल.' (हेही वाचा, Dwayne Johnson Recovered from Coronavirus: हॉलीवुड अभिनेता ड्वेन जॉन्सन व कुटुंबाला 2 आठवड्यांपूर्वी कोरोना व्हायरसची लागण; सध्या सर्वजण बरे झाल्याची माहिती (Watch Video))
ड्वेन जॉनसन म्हणजेच द रॉक यांचे वडील कृष्णवर्णीय होते तर त्यांची आई समाओ येथील राहणारी होती. ते फैनी म्हणजेच कमरेच्या बाजूने बांधण्याची बॅक वापरण्याच्या स्टाईलमुळे प्रसिद्ध आहेत. दरम्यान, हे पहिल्यांदाच घडले नाही. या आधीही 2017 मध्ये द रॉक ने आपण अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढण्याबाबत गांभीर्याने विचार करत असल्याचे म्हटले होते.