अमेरिकेचे अध्यक्ष Joe Biden यांच्यावर लाचखोरीचा आरोप; युक्रेनियन फर्मकडून घेतले 5 दशलक्ष डॉलर्स- Reports
रिपब्लिकन खासदारांनी आरोप केला आहे की, अध्यक्ष बिडेन व्यतिरिक्त, त्यांचा मुलगा हंटर बिडेन याला देखील युक्रेनियन गॅस कंपनीचे भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून संरक्षण करण्यासाठी $ 5 दशलक्ष मिळाले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन (US President Joe Biden) मोठ्या संकटात सापडले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आणि रशिया-युक्रेन युद्धादरम्यान एका अहवालात धक्कादायक खुलासा झाला आहे. बिडेन यांच्यावर युक्रेनमधील एका कंपनीकडून 5 मिलियन डॉलर्सची लाच (Bribe) घेतल्याचा आरोप आहे. एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, राष्ट्राध्यक्ष बिडेन यांना युक्रेनियन गॅस कंपनी बुरिस्मा होल्डिंग्जच्या (Burisma Holdings) कार्यकारी अधिकाऱ्याकडून पाच दशलक्ष डॉलर्सची रक्कम किकबॅकमध्ये मिळाली आहे.
ही तीच कंपनी आहे जिथे जो बिडेनचा मुलगा हंटर बिडेन बोर्ड सदस्य होता. हंटर बिडेनने या कंपनीत दीर्घकाळ काम केले आहे. युक्रेन जवळजवळ दीड वर्ष रशियाशी युद्ध लढत आहे, या दरम्यान हे लाचखोरी प्रकरण उघडकीस आले आहे. या गॅस कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी सुरू असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. युक्रेनचे वकील व्हिक्टर शोकिन याचा तपास करत आहेत.
भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सामना करणार्या एक्झिक्युटिव्हने जो बिडेन यांच्याकडे मदत मागितली होती. आरोपांमुळे कंपनी गुंतवणूक करू शकत नव्हती त्यामुळे त्यांनी जो बिडेन यांची मदत घेतली. बातम्यांनुसार, जो बिडेन यांना आपली भ्रष्टाचाराची चौकशी संपवण्यासाठी 5 दशलक्ष डॉलर्स देण्यात आले होते. एफबीआयला जून 2020 मध्ये एका गोपनीय स्त्रोताकडून याची माहिती मिळाली.
सूत्राने सूचित केले की, जो बिडेन आणि एक परदेशी नागरिक गुन्हेगारी लाचखोरी घोटाळ्यात सामील होते. अहवालात FBI FD-1023 फॉर्मचा उल्लेख आहे, जो FBI एजंट गोपनीय मानवी स्त्रोतांद्वारे प्रदान केलेली असत्यापित माहिती प्रविष्ट करण्यासाठी वापरतात. अहवालानुसार, एफबीआय दस्तऐवजात युक्रेनियन वकिलाला काढून टाकण्यासाठी जो बिडेनला $5 दशलक्ष कसे दिले गेले याबद्दल सर्व माहिती नमूद केली आहे. युक्रेनियन तेल कंपनी बुरिस्मा होल्डिंग्जच्या मालकाकडून हे पैसे कथितपणे आले आहेत. (हेही वाचा: बोरिस जॉन्सन यांचा खासदारकी चा देखील राजीनामा; 'Witch-Hunt’ चा बळी पडल्याचा दावा)
आता रिपब्लिकन खासदारांनी आरोप केला आहे की, अध्यक्ष बिडेन व्यतिरिक्त, त्यांचा मुलगा हंटर बिडेन याला देखील युक्रेनियन गॅस कंपनीचे भ्रष्टाचाराच्या चौकशीपासून संरक्षण करण्यासाठी $ 5 दशलक्ष मिळाले आहेत.