US First Lady Jill Biden यांची कोविड 19 चाचणी पॉझिटिव्ह; US President Biden यांची चाचणी निगेटिव्ह

राष्ट्राध्यक्ष Biden यांनी मागील महिन्यातच अमेरिकेतील नागरिकांना या आजाराच्या पार्श्वभूमीवर बुस्टर शॉर्ट घेण्याचे आवाहन केले आहे.

Biden । Twitter

G20 Summit साठी भारत दौर्‍यापूर्वी काही दिवस आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden यांची कोविड चाचणी निगेटिव्ह असली तरीही त्यांची पत्नी US First Lady Jill Biden यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती व्हाईट हाऊस कडून देण्यात आली आहे. त्यांची कोविडची लक्षणं सौम्य असून त्यांच्यावर घरातच उपचार केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. Rehoboth Beach, Delaware येथील त्यांच्या घरातच जिल बायडन राहणार आहेत.

जो बायडन यांना सध्या कोणतीही लक्षणं नाहीत. परंतू पुढील आठवडाभर त्यांच्या लक्षणांवरही लक्ष ठेवले जाईल असं जारी परिपत्रकामध्ये सांगण्यात आले आहे. बिडेन यांच्या 72 वर्षीय पत्नीला 2022 च्या ऑगस्टमध्येही कोरोना झाला होता, तर  80 वर्षीय जो बिडेन जुलै 2022 मध्ये शेवटचे कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. नक्की वाचा: Covid New Variant: कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे चिंता वाढली; चार देशांमध्ये पसरले संक्रमण .

जी 20 समिट मध्ये सहभागी होण्यासाठी बायडेन 7 सप्टेंबरला भारतात येणार आहेत आणि  8 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय बैठक घेणार आहेत, असे व्हाईट हाऊसने शुक्रवारी जाहीर केले. दरम्यान बायडेन यांनीही आपण भारत दौर्‍यावर जाण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. भारतामध्ये 9 आणि 10 सप्टेंबर असे दोन दिवस जी 20 समिटचे आयोजन करण्यात आले आहे.

युनायटेड स्टेट्समध्ये मागील काही आठवड्यात कोविडची रूग्णसंख्या आणि हॉस्पिटलायझेशनमध्ये वाढ होत आहे. अचानक वाढलेल्या रूग्णसंख्येमागे Covid-19 – Pirola किंवा BA.2.86 हे व्हेरिएंट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. CDC ने या व्हेरिएंटला धोकादायक म्हटलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी संसर्ग वाढल्याचं आढळल्याचं सांगण्यात आले आहे. राष्ट्राध्यक्ष Biden यांनी मागील महिन्यातच अमेरिकेतील नागरिकांना या आजाराच्या पार्श्वभूमीवर बुस्टर शॉर्ट घेण्याचे आवाहन केले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif