COVID-19: अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरुच! गेल्या 24 तासांत 2000 हून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू
अमेरिकेत कोरोनामुळे मृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून गेल्या 24 तासांत 2000 हून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती AFP न्यूज एजन्सीने दिली आहे
संपूर्ण जगभरात कोरोना ने हाहाकार माजविला असून याचा सर्वात जास्त फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत (USA) कोरोनामुळे मृतांची संख्या दिवसागणिक वाढत असून गेल्या 24 तासांत 2000 हून अधिक कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती AFP न्यूज एजन्सीने दिली आहे. जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 33,08,323 वर पोहोचली असून 2,34,112 रुग्ण दगावल्याची माहिती Worldometers ने दिली आहे. अमेरिकेत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मृतांच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे.
अमेरिकेत कोरोना संक्रमितांची रुग्णांची एकूण संख्या 10 लाखांच्या वर पोहोचली असून 63 हजारांहून अधिक रुग्ण दगावले आहेत. तर स्पेनमध्ये कोरोना संक्रमितांची रुग्णांची एकूण संख्या 2,39,639 वर पोहोचली आहे. Coronavirus Outbreak in India: भारतातील कोरोना बाधितांनी गाठला 35000 चा टप्पा; मागील 24 तासांत 1993 नव्या रुग्णांची भर
तर भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 35,043 वर पोहोचली असून मृतांची एकूण संख्या 1147 इतकी झाली आहे. ततर 8889 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत देशात 73 रुग्ण दगावले असून 1993 नवीन रुग्ण आढळले आहेत. ही आकडेवारी खूपच धक्कादायक असून कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय आणि वैद्यकिय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.