United Kingdom News: कामावर मोबाईल वापरला म्हणून महिलेला नोकरीवरून हटवलं

कामादरम्यान फोन वापरताना आढळून आल्याने या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं.

Mobile Phone Representational Image (Photo Credits: Pixabay)

आजकाल बहुतेक काम मोबाईलवरूनच कुठेही करता येतात. त्यातच सोशल मीडियाच्या व्यसनामुळे लोक तासभरही आपला फोन स्वत:पासून वेगळा ठेवत नाहीत. कोणीही कामात कितीही व्यस्त असलं तरी, काही वेळाने फोन चेक करायला विसरत नाही. काही ऑफिसमध्ये तर फोनवर सर्व कामं होतात. पण, काही ठिकाणी फोन वापरण्याबाबत कडक नियम आहेत. याच नियमांचा फटका एका महिलेला बसला आहे. कामावर फोन वापरल्याबद्दल एका महिलेला तिच्या नोकरीतून काढून टाकण्यात आलं. ब्रिटनमधील मँचेस्टर रेस्टॉरंटमध्ये फोन वापरल्यामुळे एका महिलेला नोकरी गमवावी लागली आहे.  (हेही वाचा - Anju Weds Nasrullah: भारतीय महिला अंजूने पाकिस्तानमध्ये केले नसरुल्लाहशी लग्न; स्वीकारला इस्लाम, नवीन बदललेले नाव 'फातिमा', Watch Video)

ही महिला ब्रिटनमधील एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होती. कामादरम्यान फोन वापरताना आढळून आल्याने या महिलेला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. न्यूयॉर्क पोस्टनुसार, ड्युटीवर मोबाईल वापरल्यामुळे महिलेला मँचेस्टर रेस्टॉरंटमध्ये नोकरी गमवावी लागली. सोफी अल्कॉक असं या महिलेचं नाव आहे. तिने बॉसने कामावरून काढल्याचा व्हिडीओही बनवला होता.

सोफीने सांगितलं की, तिने कामाची शिफ्ट सुरु शिफ्ट सुरू होण्यापूर्वी आणि शिफ्ट संपल्यानंतर फोन वापरला होता. यावेळी सोफीनं युक्तिवाद करत सांगितलं की, जर तिने तिचा फोन स्वयंपाकघरात वापरला असता तर ऑर्डर मिळाली नसती. दरम्यान, सध्या या महिलेचा व्हिडीओ आणि बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.