संयुक्त राष्ट्र: पाकिस्तान PM च्या भाषणाविरोधात UNGA मधून भारताचे वॉकआउट, इमरान यांनी संबोधनात RSS आणि कश्मीर मुद्द्यांवर साधला निशाणा

त्यावेळी भारतावर निशाणा साधला जात असल्याचे दिसून आले.

फर्स्ट सेकेट्ररी मिजितो विनितो आणि पाकिस्तान पंतप्रधान इमरान खान (Photo Credits: Twitter)

UNGA 2020: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान (Pakistan PM)  इमरान खान  (Imran Khan) यांचे संबोधन सुरु झाल्यानंतर त्यांनी त्यामधून वॉकआउट (निघून गेले) केले. त्यावेळी भारतावर निशाणा साधला जात असल्याचे दिसून आले. एम्बेसी चेम्बरच्या पहिल्या रांगेतील दुसऱ्या सीटवर बसलेले फर्स्ट सेक्रेटरी मिजितो विनितो (Mijito Vinito) यांनी आपली सीट सोडली. इमरान यांनी युएनजीए मध्ये संबोधन करण्यापूर्वी आरआरएस (RSS) आणि त्यानंतर कश्मीरच्या (Kashmir) मुद्द्यावरुन निशाणा साधला. इमरान खान यांनी भारतातील हल्ल्यांसाठी दबलेल्या आवाजात दहशतवाद्यांना समर्थन देण्याची घोषणा सुद्धा केली.

इमरान खान यांनी असे म्हटले की, पाकिस्ताचे सरकार आणि लोक कश्मीर मधील बंधू-भगिनींच्या आत्मनिर्णयासाठी संघर्ष करण्यासाठी समर्थन करत आहे. तसेच त्यांच्यासोबत उभे राहण्यास सुद्धा तयार आहे. भारतावर करण्यात आलेल्या हल्ल्यांना त्यांनी खोटे ठरवत अशा प्रकारचा प्रचार ही फेटाळून लावला. भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.ए. तिरुमुर्ती यांनी इमरान खान यांच्यावर टीका करत असे म्हटले की, युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करणारे त्यांचे भाषण होते.(PM Narendra Modi to address UNGA 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 सप्टेंबरला युएनजीए मध्ये संबोधित करणार)

एका ट्वीट मध्ये त्यांनी असे ही म्हटले की, 75 व्या संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान यांचे विधान एक निम्रस्तरीय मुत्सदी पणाचे पाऊल असल्याचे वाटते. चालाखी, असत्य आणि व्यक्तिगत हल्लांनी भरलेले होते. आपल्या स्वत:च्या अल्पसंख्यकांचा छळ करणाऱ्या पाकिस्तानने सीमेच्या पार दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारताला याचे प्रतिउत्तर देण्यासाठी हक्क आहे. संविधानानुसार मुस्लिमांव्यतिरिक्त अहमदिया संप्रदायाच्या मुस्लिमांना पूर्ण नागरिकेतेच्या अधिकारांपासून वंचित ठेवणारे इस्लामी गणतंत्राचे पंतप्रधान यांनी म्हटले की, भारत महात्मा गांधी यांच्या धर्मनिरपेक्षतेचा त्याग करत असून हिंदूत्व राज्याच्या दिशेने पुढे जात आहे.