Umrah Pilgrims Accident: उमरा यात्रेकरुंच्या बसला भीषण अपघात; 20 ठार, 29 जखमी
सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) नैऋत्येला असीर गव्हर्नरेटमधील अकाबा शहरा नजिक (Abha City ) येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, भाविकांची एक बस सोमवारी (28 मार्च) सकाळी एका पुलालावरुन उलटली.
उमरा (Umrah Pilgrims) यात्रेकरुंच्या बसला झालेल्या अपघातात तब्बल 20 जण ठार तर 29 जण गंभीर जखमी झाले आहेत. सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) नैऋत्येला असीर गव्हर्नरेटमधील अकाबा शहरा नजिक (Abha City ) येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, भाविकांची एक बस सोमवारी (28 मार्च) सकाळी एका पुलालावरुन उलटली. ज्यामुळे बसला भीषण आग लागली. ब्रेक फेल झाल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हा अपघात असीर प्रांत आणि आभा शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर घडला. बसमधील सर्व भाविक उमराह करण्यासाठी मक्केला जात होती. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणांवर भाविकांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा, नॅशव्हिले येथील खाजगी ख्रिश्चन शाळेत गोळीबार; 7 जणांचा मृत्यू)
ट्विट
अपघाताची माहिती मिळताच तातडीने रेड क्रेसेंट टीमसह आपत्कालीन सेवा त्वरित अपघातस्थळी पाठवण्यात आल्या आणि जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मदत आणि बचवा कार्य वेगाने सुरु करण्यात आले. ज्यामुळे काही जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले, अशी माहिती स्थानिक प्रशासननाने दिली आहे.