इराणची राजधानी तेहरानमध्ये झाला मोठा विमान अपघात; 180 पॅसेंजर मृत्यूमुखी

180 प्रवासी युक्रेनचे बोइंग विमान 737 मधून प्रवास करत होते. जॉर्डन न्यूज एजन्सीनुसार, हे सर्वच्या सर्व 180 मृत पावल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Iran Plane Accident Representative Image (Photo Credits: File)

अमेरिका-इराणमधील (America-Iran) तणावग्रस्त परिस्थिती दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहे. या परिस्थितीमुळे लवकरच तिथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. इराणची राजधानी तेहरान (Tehran) मध्ये मोठा विमान अपघात झाला आहे. 180 प्रवासी युक्रेनचे बोइंग विमान 737 मधून प्रवास करत होते. जॉर्डन न्यूज एजन्सीनुसार, हे सर्वच्या सर्व 180 प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत. तेहरान विमानतळाजवळ हे विमान कोसळल्याची माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती स्थानिक वृत्तसंस्थांनी दिली आहे. अपघातग्रस्त विमान हे युक्रेनची राजधानी कीव येथे जात होते. विमानात १८० प्रवासी आणि क्रू होता. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

युक्रेन एअरलाइन्सचे बोईंग ७३७ या विमानाने तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतले. अवघ्या काही वेळेतच विमान कोसळले. तेहरानच्या इमाम खुमैनी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ही दुर्घटना घडली. सध्या तरी ही दुर्घटना कशी व का घडली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. बचावकार्य सुरु असून लवकरच संबंधित घटनेबाबत माहिती दिली जाईल.

हेदेखील वाचा- इराणचा अमेरिकेवर पलटवार; लष्करी तळांवर डागली 12 क्षेपणास्त्रे

तर दुसरीकडे अमेरिकेने इराण आणि इराकचे एअर स्पेस बंद केले आहेत. त्याच्यानंतर इराण-अमेरिकेमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. खरे पाहता इराण ने इराकमधील कमीत कमी दोन लष्करी तळांवर 12 पेक्षा जास्त बेलिस्टिक मिसाइलने हल्ला केला आहे. ज्याचे परिणाम स्वरुप अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प लवकरच उत्तर देऊ असा इशारा इराणला दिला आहे.

प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेच्या हिंद महासागरात आपले फायटर प्लेन B52 तैनात केले आहेत.

इराणने अमेरिकेला प्रतिउत्तर म्हणून इराकमधील अमेरिकेच्या दोन लष्करी हवाई तळावर हल्ला केला आहे. इराणने अमेरिकेच्या अल असद या लष्करी तळांवर 12 क्षेपणास्त्रे डागली आहेत. इराण कमांडर कासिम सुलेमानी  (Kasim Sulemani) याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणने अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. या वृत्ताला अमेरिकेनेही दुजोरा दिला आहे.