Russia-Ukraine War: कीवमध्ये रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनियन अभिनेत्री Oksana Shvets चा मृत्यू

तिला युक्रेनचा सर्वोच्च कलात्मक सन्मान देखील प्रदान करण्यात आला होता.

Ukrainian actress Oksana Shvets (PC - Twitter)

Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात सैनिकांसोबतच नागरिकांचाही मृत्यू होत आहे. युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. युक्रेनची अभिनेत्री ओक्साना श्वेट्स (Oksana Shvets) देखील रशियन हल्ल्याची बळी ठरली आहे. 67 वर्षीय थिएटर अभिनेत्री ओक्साना श्वेट्सचा रशियातील कीव येथे झालेल्या रॉकेट हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

ओक्साना श्वेट्सच्या मृत्यूची बातमी यंग थिएटर कम्युनिटीने दिली आहे. येथे ओक्सानाने बराच काळ काम केले. थिएटरशी संलग्न ओक्साना श्वेट्स कीवमध्ये रॉकेट हल्ल्यात ठार झाली. नाट्यसृष्टीने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे ही बातमी दिली आहे. (हेही वाचा - Russia-Ukraine War: रशिया युक्रेन युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर संकट, कृषी उत्पादनांसह, खाद्य तेल आणि इंधनही महागण्याची शक्यता)

निवासी इमारतीवर रशियन रॉकेट हल्ल्यात ओक्साना श्वेट्सचा मृत्यू झाला आहे. फेसबुक पोस्टवर ओक्सानाला श्रद्धांजली वाहण्यात आली असून युद्धाबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली आहे. ओक्साना श्वेट्स ही युक्रेनमधील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिला युक्रेनचा सर्वोच्च कलात्मक सन्मान देखील प्रदान करण्यात आला होता. त्यांनी Ivan Franko Theater आणि Kiev State Institute of Theater Arts मध्ये शिक्षण घेतले. याशिवाय त्यांनी Ternopil Music and Drama Theater आणि Kiev Theater of Satire मध्येही काम केले.

ओक्साना श्वेट्सपूर्वी, प्रसिद्ध युक्रेनियन चित्रपट दिग्दर्शक आणि पत्रकार ब्रेंट रेनॉड यांचे निधन झाले होते. युक्रेनमधील इरपिन शहरावर रशियन सैन्याने केलेल्या गोळीबारात ब्रेंटची कार आल्याचे सांगण्यात आले. एएफपीच्या वृत्तानुसार, या हल्ल्यात ब्रेंटचा मृत्यू झाला. त्याच्यासोबतचा आणखी एक पत्रकार जुआन अरेडोंडो याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे दोघेही युक्रेनच्या निर्वासितांचा अहवाल तयार करत होते.