Brexit Deal: ब्रिटिश पार्लमेंटमध्ये दुसर्यांदा 'ब्रेक्झिट करार' नाकारला
28 देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या नागरिकांनी 52 टक्के नागरिकांनी मतदान केले आहे.
युरोपियन संघातून (European Union बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या प्रतिनिधीगृहात सादर करण्यात आलेल्या ब्रेक्झिट करारावर (Brexit Deal) मंगळवारी मतदान घेण्यात आले. हा करार पुन्हा फेटाळण्यात आल्याने ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पंतप्रधान थेरेसा मे (Theresa May) यांना धक्का बसला आहे. हा प्रस्ताव 391 विरुद्ध 242 मतांनी फेटाळण्यात आला. थेरेसा मे यांचा Brexit करार ब्रिटन संसदेत अमान्य
युरोपियन संघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या जनतेने 2016 साली कौल दिला. त्यानंतर ब्रिटन सातत्याने युरोपियन महासंघाशी वाटाघाटी करत आहे. ब्रेग्झिट करारावर ब्रिटिश पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मतदान पार पडले. 391 विरुद्ध 242 मतांनी हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. यामध्ये हुजूर पक्षाच्या 75 खसदारांचादेखील समावेश आहे. यापूर्वी जानेवारी 2019 मध्येही करारावर मतदान घेण्यात आले होते. त्यावेळेस 432 विरुद्ध 202 मतांनी पराभव झाला होता.
28 देशांच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रिटनच्या नागरिकांनी 52 टक्के नागरिकांनी मतदान केले आहे. त्यामुळे आता युरोपीय महासंघातून बाहेर पडताना नागरिकांना कोणकोणत्या सोयी देण्यात याव्यात, नियमांमध्ये कोणते बदल होतील याबाबत वाटाघाटी सुरू आहेत.