लंडन कोर्टाचा 'विजय मल्ल्या'ला दणका! प्रत्यार्पण विरोधातील याचिका फेटाळली
विजय मल्ल्या यांच्यावर भारतीय बॅंकांचे सध्या 9 हजार कोटी बुडवल्याचा आरोप आहे.
विजय मल्याला ब्रिटन कोर्टाने (UK Court ) प्रत्यार्पणविरोधातील याचिका (extradition order) फेटाळल्याने एक मोठा धक्का दिला आहे. भारतीय बॅंकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्याला ( Vijay Mallya)आता भारतामध्ये आणण्याची शक्यता वाढली आहे. मल्ल्याला भारतामध्ये परत आणण्यासाठी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाची खास टीम ब्रिटन सरकारसोबत काम करत होती. 'फरार आर्थिक गुन्हेगार' जाहीर झाल्यामुळे बचावासाठी विजय मल्ल्याची धडपड सुरु
ANI ट्विट
मल्ल्या लंडनमध्ये फरार
विजय मल्ल्या यांच्यावर भारतीय बॅंकांचे सध्या 9 हजार कोटी बुडवल्याचा आरोप आहे. भारतीय कोर्ट कचाट्यातून पळून गेलेला मल्य्या लंडनमध्ये आहे. सध्या वेस्टमिंस्टर कोर्टामध्ये त्याच्यावर खटला सुरू आहे.
मुद्दलाचे पूर्ण पैसे देतो, व्याज नाही अशा आशयाचा एक प्रस्ताव मल्ल्याने बॅंकांकडे पाठवला होता.परंतू बॅंकांकडून तो मान्य होण्याची शक्यता कमी आहे. नितीन गडकरींनी देखील मल्ल्याची पाठराखण केली होती. आता कायदेशीर मार्गाप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यासाठी विजय मल्ल्याकडे काही वेळ आहे.