Britain ठरला Pfizer-BioNTech COVID-19 Vaccine च्या वापराला मंजुरी देणारा जगातील पहिला देश; पुढील आठवड्यापासून लसीकरण शक्य

आता पुढील आठवड्याच्या सुरूवातीला या लसीच्या रोल आऊटला सुरूवात होणार आहे.

Pfizer (Photo Credits: IANS)

कोविड 19 ला रोखण्यासाठी सारं जग लसीच्या प्रतिक्षेमध्ये असताना आज (2 डिसेंबर) ब्रिटन मधून एक खूषखबर आली आहे. अमेरिकेच्या Pfizer-BioNTech COVID-19 vaccine ला emergency use authorization देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरला आहे. आता पुढील आठवड्याच्या सुरूवातीला या लसीच्या रोल आऊटला सुरूवात होणार आहे. दरम्यान ब्रिटन सरकारने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी MHRA च्या सूचनांचा विचार करून आता फायझर आणि बायोटेकच्या लसीला वापर करण्यास मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यापासून आता त्याच्या लसीकरणाला सुरूवात केली जाऊ शकते. जाणून घ्या अमेरिकेच्या Pfizer Inc आणि BioNTech SE कंपनीच्या लसीबद्दल खास गोष्टी!

दरम्यान ब्रिटनच्या या निर्णयावर फायझर कंपनीकडून आनंद व्यक्त करण्यात आला आहे. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. फायझर ही अमेरिकन तर बायोटेक ही जर्मन कंपनी असून त्यांनी एकत्रित पणे ही लस विकसित केली आहे. ब्रिटन पाठोपाठ आता अमेरिकेतही एफडीए कडून त्याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

ANI Tweet

Health Secretary Matt Hancock यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. याबाबत हॉस्पिटल सज्ज असून ठराविक लस उपलब्ध होणार असून त्याच्या लसीकरणाला सुरूवात होणार असल्याचं म्हटलं आहे.

Pfizer-BioNTech COVID-19 vaccine ही mRna वॅक्सिन आहे. काही दिवसांपूर्वी 95% पेक्षा अधिक प्रभावी असल्याचा दावा फायझर कडून करण्यात आला होता.