Man Kills Roommate Over TV Remote: टीव्ही रिमोट शोधण्यावरुन वाद, रुम पार्टनरची हत्या
टीव्ही रिमोट (TV Remote Dispute) सापडत नसल्याच्या वादातून एका रिचर्ड बेनॉ नामक 38 वर्षीय व्यक्तीने त्याच्या डोमोनिक स्कॉट हेस नावाच्या 27 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी आणि पीडित परस्परांचे रुमपार्टनर (Man Kills Roommate) आहेत.
वादासाठी किरसोळ कारण पुरेसे ठरते पण किरकोळ वादावरुन सुरु झालेला हाच वाद पुढे इतके गंभीर वळण घेतो की, ज्यात एखाद्याला आपले प्राण गमवावे लागतात. मेरीलँड (Maryland) येथे अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. टीव्ही रिमोट (TV Remote Dispute) सापडत नसल्याच्या वादातून एका रिचर्ड बेनॉ नामक 38 वर्षीय व्यक्तीने त्याच्या डोमोनिक स्कॉट हेस नावाच्या 27 वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी आणि पीडित परस्परांचे रुमपार्टनर (Man Kills Roommate) आहेत. आरोपीने केलेल्या गोळीबारात पीडित गंभीर जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीला अटक करण्यात आली असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.
घटना घडल्यावर सहा तासांनी पोलिसांना माहिती
प्रिन्स जॉर्ज काउंटी पोलिसांनी इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, गोळीबाराची घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 10 जानेवारी रोजी सुमारे 12:30 वाजता प्राप्त माहितीनुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले असता स्टॉट हेस नामक तरुण रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडला होता. दरम्यान, फॉक्स न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, घटानस्थळावर पोलीस 12:30 वाजता पोहोचले असले तरी ही घटना पहाटे 5:30 ते पहाटे 6 च्या दरम्यान घडली. मात्र, घडलेल्या घटनेबाबता पोलिसांना जवळपास सहा तासांनंतर माहिती देण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याने पोलिसांना सांगितले आहे की, त्याच्या रुम पार्टनरने त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण बचावासाठी गोळीबार केला. (हेही वाचा, Crime: मुंबईत रूममेटची हत्या केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुण अटकेत)
इन्स्टाग्राम पोस्ट
स्वबचावासाठी गोळीबार केल्याचा आरोपीचा दावा
आरोपीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, तो झोप्यावर झोपला होता तेव्हा स्कॉट हेस हा किचनमध्ये काहीतरी करत होता. त्याने टीव्हीचा आवाज वाढवून ठेवला होता त्यामुळे गोंगाट वाढत होता. आवज कमी करण्यासाठी मी टीव्ही रिमोट शोधत होतो. मात्र, तो मिळत नव्हता. मी त्याच्याकडे रिमोटसाठी वारंवार विचारणा केली. मात्र त्याने दुर्लक्ष केले. शेवटी मी तोंडावर पांघरुन घेऊन झोपी गेले. मात्र, त्याने माझ्या तोंडावरचे पांघरुन ओढले. मी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने चाकू घेऊन माझ्या अंगावर चाल केली. बचावासाठी मी तातडीने माझी हँडगण काढली आणि त्याच्यावर गोळी झाडून मी तिसऱ्या मजल्यावर पळून गेलो. आरोपीने एकच गोळी झाडल्याची माहिती दिली असली तरी पोलिस तपासात मात्र भिंतींवर गोळीबार झाल्याच्या आणि अनेक गोळ्या झाडल्याच्या निशाणी आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे. टीव्हीचा रिमोट सापडत नसल्याच्या किरकोळ कारणातून हत्या घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.