Train Derails In Pakistan: पाकिस्तानमध्ये ट्रेन रुळावरून घसरली; 15 ठार, 40 हून अधिक जखमी

हजारा एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीला जात असताना नवाबशाह भागातील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात रविवारी (6 जुलै) घडला. पाकिस्तान रेल्वेचे उपअधीक्षक महमूद रहमान यांनी घटनेची पुष्टी केली आहे.

Indian Railways | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Railway Accident In Pakistan: पाकिस्तानातील रावळपींडी येथे ट्रेन रुळावरुन घसरून झालेल्या दुर्घटनेत 15 जन ठार तर 45 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. हजारा एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीला जात असताना नवाबशाह भागातील सरहरी रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात रविवारी (6 जुलै) घडला. पाकिस्तान रेल्वेचे उपअधीक्षक महमूद रहमान यांनी घटनेची पुष्टी केली आहे. माहिती देताना त्यांनी रुळावरुन घसरलेल्या बोगीतून किमान 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले तर सुमारे 50 जखमींना रुग्णालयात नेले जात असल्याचे सांगितले.

रेल्वे अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले की, हजारा एक्स्प्रेस कराचीहून अबोटाबादला जात होती. या वेळी या एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. स्थानिक रेल्वे अधिकारी इजाज शाह यांनी वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, अपघातात काही प्रवासी ठार झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. त्यासाठी एक मदत ट्रेन घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे. (हेही वाचा, Odisha Train Accident: रेल्वे अपघात कसे टाळता येऊ शकतात? भारत 'या' देशांकडून प्रगत तंत्रज्ञान प्रणाली अवगत करू शकतो; काय आहे रेल्वे अपघात रोखण्याचं तंत्रज्ञान? जाणून घ्या)

स्थानिक प्रसारमाध्यमांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ट्रेनची विदीर्ण आवस्था पाहायला मिळत आहे. प्रवासी बोगीत अडकले आहेत. मदत आणि बचाव कार्य करणारे लोक बोगीच्या खिडक्या खीडक्या फोटून बोगीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढत आहेत. पाकिस्तानच्या पुरातन रेल्वे प्रणालीवर अपघात आणि रुळावरून घसरण्याच्या घटना वारंवार घडतात.

ट्विट

जून 2021 मध्ये सिंधमधील डहरकीजवळ दोन गाड्यांची टक्कर होऊन किमान 65 लोक ठार झाले आणि सुमारे 150 जण जखमी झाले. त्या अपघातात, एक एक्स्प्रेस विरुद्ध रुळावर रुळावरून घसरली आणि साधारण एक मिनिटानंतर दुसरी पॅसेंजर ट्रेन मलबेवर आदळली.