Titanic Submarine: बेपत्ता पाणबुडीतील पायलटची पत्नी 111 वर्षांपूर्वी टायटॅनिक सोबत बुडालेल्या जोडप्याची वंशज

ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश ( OceanGate CEO Stockton Rush) यांची पत्नी, जी बेपत्ता झालेल्या बेपत्ता झालेल्या पाणबुडीवरील पाच जणांपैकी एक आहे. ती 1912 मध्ये जहाज बुडाल्यावर मरण पावलेल्या दोन प्रथम श्रेणीतील प्रवाशांची वंशज आहे.

Titan Submersible (Photo Credits: Twitter)

टायटॅनिक (Titanic) जहाजाचा शोध घेण्यासाठी अटलांटिक महासागराच्या (Atlantic Ocean) तळाशी गेलेल्या Titan Submersible अचानक संपर्कहीन झाली. अनेक तास शोध घेऊनही न सपाडल्याने आणि पाणबुडीवर असलेला कृत्रिम ऑक्सिजनचा साठा संपण्याचा अधिकृत कालावधी उलटल्यानंतर या पाणबुडीतील पाच जणांचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. दरम्यान, ही पाणबुडी आणि टायटॅनिक यांचा अतिशय जवळचा संबंध लावला जातो आहे. कारण, ओशनगेटचे सीईओ स्टॉकटन रश ( OceanGate CEO Stockton Rush) यांची पत्नी, जी बेपत्ता झालेल्या बेपत्ता झालेल्या पाणबुडीवरील पाच जणांपैकी एक आहे. ती 1912 मध्ये जहाज बुडाल्यावर मरण पावलेल्या दोन प्रथम श्रेणीतील प्रवाशांची वंशज आहे. द न्यूयॉर्क टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

आउटलेटने प्रसिद्धीस दिलेल्या वृत्तानुसार, वेंडी रश (Wendy Rush) - ज्या ओशनगेट येथे कम्युनिकेशन संचालक आहेत. त्या इसिडॉर आणि इडा स्ट्रॉसची पणतू आहे. इसिडॉर आणि इडा स्ट्रॉस यांचा मृत्यू टायटॅनिक दुर्घटनेत झाला. टायटॅनिक जहाज हिमखंडाला आदळल्यानंतर आणि उत्तर अटलांटिक महासागरात बुडाल्याच्या घटनेताला आता शंभरहून अधिक वर्षांचा काळ लोटला आहे. (हेही वाचा, Titan submersible: टायटॅनिकचे अवशेष पहायला गेलेल्या पाणबुडीचे अखेर सापडले अवशेष; पाचही प्रवाशांचा मृत्यू)

सन 1905 मध्ये जन्मलेले वेंडी हॉलिंग्स वेइल हे स्ट्रॉसच्या मुलींपैकी एक आहेत. ते मिनीची वंशज आहेत. त्यांनी डॉ. रिचर्ड वेल यांच्याशी लग्न केले, जे वेंडीचे पणजोबा आहेत. दरम्यान, सन 1997 मध्ये प्रदर्शीत झालेल्या जेम्स कॅमेरॉनच्या टायटॅनिक चित्रपटात स्ट्रॉसच्या नातेसंबंधाची काल्पनिक आवृत्ती समाविष्ट करण्यात आली होती. ज्यामध्ये एक जोडपे त्यांच्या केबिनमध्ये पाणी उतळताना एकमेकांना धरून बसलेले होते. टाईम्सच्या म्हणण्यानुसार, टायटॅनिक दुर्घटनेत वाचलेल्यांनी या जोडप्याला जहाजाच्या डेकवर पाहिल्याचे सांगितले. मात्र, पुढे त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, जलसमाधी मिळाल्यावर आटलांटिक महासागराच्या एका दूर्गम कोपऱ्यात तळाशी जाऊन चिरनिद्रा घेत असलेले ऐतिहासिक टायटॅनिक जहाज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. इतक्या वर्षानंतरही या जहाजाविषयीच्या गूढ कहाण्या जिज्ञासूंना खुणावतात. त्याचाच एक भाग म्हणून आताही एक Titan Submersible नावाची पाणबुडी या जहाजाचा शोध घेण्यास गेली खरी. मात्र, अचानकपणे ही पाणबुडी संपर्कहीन झाली.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now