IPL Auction 2025 Live

Afghanistan-Taliban Conflict: अमेरिकेने अफगाणिस्थानातून सैन्य मागे घेतल्यावर तालिबान्यांनी केला जल्लोष साजरा, आता पुर्णपणे स्वातंत्र्याची केली घोषणा

तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले की, सर्व अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ (Kabul Airport) सोडले आहे आणि आता आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे.

Taliban Attack (Representational Image/ Photo Credit: Getty)

तालिबानने (Taliban) अमेरिकन सैन्य (American military) देशातून पूर्णपणे मागे घेतल्यानंतर अफगाणिस्तानचे (Afghanistan) स्वातंत्र्य घोषित केले आहे.  तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी मंगळवारी सांगितले की, सर्व अमेरिकन सैन्याने काबूल विमानतळ (Kabul Airport) सोडले आहे आणि आता आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे.अमेरिकेने मंगळवारच्या अंतिम मुदतीपूर्वी आपले सैन्य मागे घेण्याची माहिती दिली आहे. ज्यामुळे युद्धग्रस्त देशात अमेरिकेची सुमारे 20 वर्षे लष्करी उपस्थिती संपली आहे. तालिबान लढाऊंनी सोमवारी रात्री उशिरा अमेरिकन विमाने उडताना पाहिली. यानंतर हवेत गोळीबार केला आणि त्यांचा विजय साजरा केला. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तैनात असलेले तालिबान लढाऊ हेमाड शेरजाद म्हणाले, शेवटची पाच विमाने निघून गेली आहेत आणि आता ऑपरेशन संपले आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आमचे 20 वर्षांचे बलिदान कामी आले आहे.

अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आहे. आता अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या ताब्यात आहे. यूएस सेंट्रल कमांडचे जनरल फ्रँक मॅकेन्झी यांनीही वॉशिंग्टनमध्ये ऑपरेशन पूर्ण करण्याची घोषणा केली आहे. शेवटची विमाने काबूल विमानतळावरून दुपारी 3:29 वाजता उड्डाण केली.  अमेरिकेने आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्यासाठी 31 ऑगस्टची मुदत दिली होती.

दरम्यान अफगाणिस्तान सोडल्यानंतर अमेरिकेचे मोठे विधान समोर आले आहे.  अमेरिकेने स्पष्ट आणि कठोरपणे सांगितले आहे की ज्या अफगाणांना आपला देश सोडायचा आहे त्यांच्यासाठी कोणतीही अंतिम मुदत नाही. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री, इतर देशांसह, अमेरिकन, अफगाण किंवा इतर कोणत्याही देशातील नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू ठेवतील. म्हणजेच, जर अफगाणिस्तानात अडकलेल्या लोकांना बाहेर पडायचे असेल तर अमेरिका त्यांना प्रत्येक शक्य मार्गाने मदत करेल. त्यांच्यासाठी कोणतीही मुदत नाही. हेही वाचा South Africa मध्ये सापडला Covid-19 चा आतापर्यंतचा सर्वात संसर्गजन्य व्हेरिएंट C.1.2; कोरोना लसीवरही देऊ शकेल मात

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकेन म्हणाले, आम्ही काबूलमध्ये राजनैतिक उपस्थिती संपवली आहे. आमचे कामकाज दोहाला हलवले आहे. आमचे सैन्य अफगाणिस्तानातून निघून गेले आहे. पण अमेरिका अफगाणिस्तानच्या लोकांना मानवतावादी मदतीसाठी पाठिंबा देत राहील. सरकारद्वारे नव्हे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या एजन्सी, स्वयंसेवी संस्थांसारख्या स्वतंत्र संस्थांच्या माध्यमातून घडेल. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) भारताच्या सध्याच्या अध्यक्षतेखाली अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर एक ठराव मंजूर केला. युद्धग्रस्त देशाचा वापर कोणत्याही देशाला धमकावण्यासाठी किंवा हल्ला करण्यासाठी किंवा दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी केला जाऊ नये अशी मागणी केली यात केली आहे.