Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: अयोध्येपासून लंडनपर्यंत रामाचा जयघोष! ब्रिटीश संसदेत घुमला 'जय श्री राम'चा नारा
राम मंदिराचा जयघोष करण्यासाठी संसदेत शंख फुंकण्यात आले. तसेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये रामाची मूर्तीही बसवण्यात आली.
Ram Mandir Pran Pratishtha Ceremony: 22 जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या (Ram Mandir) अभिषेक सोहळ्याची केवळ भारतच नाही तर जगभरातील लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, ब्रिटनच्या संसदेत (UK Parliament) शुक्रवारी 'श्री राम' (Shri Ram) चा जयघोष करण्यात आला. राम मंदिराचा जयघोष करण्यासाठी संसदेत शंख फुंकण्यात आले. तसेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये रामाची मूर्तीही बसवण्यात आली.
ब्रिटीश संसदेत राम मंदिरासाठी आनंदोत्सव -
ब्रिटनच्या सनातन संस्थेने (SSUK) ब्रिटीश संसदेत राम मंदिरासाठी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संसदेच्या आत शंख फुंकल्याने संपूर्ण वातावरण राममय झाले. संसदेतील कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण भजनाने झाली. त्यानंतर SSUK सदस्यांनी गीतेच्या 12 व्या अध्यायाचा सखोल अभ्यास करून भगवान श्रीकृष्णाच्या जीवनाचे स्मरण केले. (हेही वाचा -Ram Lalla's Face Revealed: भाळी टिळा, हाती धनुष्य आणि स्मितहास्य देणार्या 5 वर्षाच्या भगवान श्रीरामाचे इथे पहा लोभस रूप! (View Pic))
देशभरातील 200 हून अधिक मंदिरे, सामुदायिक संस्था आणि संघटनांनी गुरुवारी यूकेच्या घोषणापत्रावर स्वाक्षरी केल्या. हे घोषणापत्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला सादर करण्यात येईल. ब्रिटनमधील धार्मिक समुदायांनी एका निवेदनात अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे स्वागत करताना आनंद व्यक्त केला. (हेही वाचा - Who Is Arun Yogiraj: MBA असूनही 5 पिढ्यांचा मूर्तिकलेचा वारसा जपण्याची निवड करणारा, अयोद्धेतील रामलल्लांच्या मूर्तीचा शिल्पकार अरूण योगीराज बद्दल जाणून घ्या खास गोष्टी! )
तथापी, 22 जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशातील अनेक नेते सहभागी होणार आहेत. या सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे. 22 जानेवारी रोजी भव्य मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीच्या अभिषेक प्रसंगी पीएम मोदी विधी करणार आहेत.