Elon Musk's Shocking Order: एलॉन मस्कचा धक्कादायक आदेश ऐकून मॅनेजरला झाली उलटी; जाणून घ्या सविस्तर
या अहवालात कंपनीतून कर्मचाऱ्यांची काढून टाकणे, एलोन मस्कचे कंपनीतील बदल आणि नवीन उत्पादनाची मुदत यासारखे मोठे निर्णय समाविष्ट आहेत.
मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटर (Twitter) विकत घेतल्यापासून, एलोन मस्कने (Elon Musk) ट्विटरच्या संदर्भात अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यापैकी एक कठोर निर्णय म्हणजे ट्विटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवणे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये नुकत्याच आलेल्या एका वृत्तातून एक नवीन माहिती समोर आली आहे, या वृत्तानुसार, कंपनीत काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचे फर्मान एलॉन मस्कने ट्विटर मॅनेजर देताच त्याला शेजारी पडलेल्या डस्टबिनमध्ये उलट्या झाल्या.
अहवालाचे शीर्षक होते, ‘टू वीक्स ऑफ कॅओस: इनसाइड एलोन मस्क टेकओव्हर ऑफ ट्विटर’. या अहवालात कंपनीतून कर्मचाऱ्यांची काढून टाकणे, एलोन मस्कचे कंपनीतील बदल आणि नवीन उत्पादनाची मुदत यासारखे मोठे निर्णय समाविष्ट आहेत. यासोबतच या अहवालासाठी ट्विटरवर काम करणाऱ्या किमान 36 कर्मचाऱ्यांची मुलाखत घेण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
कंपनीत काम करणाऱ्या काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे बडतर्फ करण्यात आल्याचे कागदपत्रांवरून समजले आहे, अशी माहिती या अहवालातून मिळाली आहे. यासोबतच एका इंजिनीअरिंग मॅनेजरला शेकडो कर्मचाऱ्यांना कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यास सांगितले. एलॉन मस्कचा हा आदेश ऐकून मॅनेजरला शेजारीच पडलेल्या डस्टबिनमध्ये उलट्या झाल्या, असेही यात नमूद केले आहे. त्याचवेळी एलॉन मस्कने दिलेली डेडलाईन पूर्ण करण्यासाठी काही लोक ऑफिसमध्येच झोपलेले दिसले. (हेही वाचा: Twitter Blue Tick: ट्विटरचे ब्लू टिक सबस्क्रिप्शन कधी सुरू करणार? Elon Musk यांनी केलं जाहीर)
2 नोव्हेंबर रोजी, ट्विटरमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना अंतर्गत स्लॅक मेसेजिंग सिस्टीमवरून कळले की, एचआर कायदेशीर संघ कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासंबंधी बोलत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सला मिळालेल्या या मेसेजनंतर एका कर्मचाऱ्याने 3738 कर्मचाऱ्यांना कंपनीतून काढून टाकले जाईल किंवा कंपनीत काम करणाऱ्या 50 टक्के लोक कंपनी सोडून जातील, असे सांगितले होते.