कोरोना व्हायरसनंतर आता उंदरांद्वारे मानवांमध्ये पसरतोय भयानक विषाणू; Hepatitis-E ला बळी पडत आहेत लोक

महत्वाचे म्हणजे हा विषाणू उंदीरांपासून मानवांमध्ये पसरू लागला आहे, अशा प्रकारे आता लोक Hepatitis-E ला बळी पडत आहेत

Representational Image. (Photo Credits: sipa/Pixabay)

सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या (Coronavirus) विळख्यात अडकले असताना, आता आणखी एक प्राणघातक विषाणू समोर आला आहे. महत्वाचे म्हणजे हा विषाणू उंदीरांपासून मानवांमध्ये पसरू लागला आहे, अशा प्रकारे आता लोक Hepatitis-E ला बळी पडत आहेत. ‘मिरर ऑनलाईन’ च्या वृत्तानुसार, हाँगकाँगमधील तज्ज्ञांनी हा दावा केला आहे. आतापर्यंत अशा 11 घटना समोर आल्या असून, यामध्ये धोकादायक विषाणू उंदीरांद्वारे मनुष्यामध्ये पसरला आहे. या संक्रमित लोकांमध्ये Hepatitis-E चा एक नवीन प्रकार आढळून आला आहे आणि या प्रकारचा विषाणू फक्त उंदरांमध्ये आढळतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. याला रॅट हिपॅटायटीस ई व्हायरस (HEV) असे म्हटले जाते.

तज्ञांच्या मते, Hepatitis-E एका व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये गलिच्छ पाण्याद्वारे पसरते आणि याचा प्रथम एखाद्या व्यक्तीच्या यकृतावर परिणाम होतो. यामुळे व्यक्ती लवकर आजारी पडते कधीकधी तिचा मृत्यूही होतो. या प्रकरणात, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सिद्धार्थ श्रीधर म्हणतात की, शेकडो लोकांना या विषाणूची लागण होऊ शकते, परंतु त्यांना याचा संसर्ग झाला आहे की नाही हे त्यांना माहित नसते. हाँगकाँगमधील Hepatitis-E विषाणूचा नवीन स्ट्रेन मानवांना वेगाने आजारी पाडत आहे. या विषाणूचा केवळ उंदरांनाच संसर्ग होत असला तरी, आता हाँगकाँगमध्ये यामुळे माणसे आजारी पडत आहेत.

हे नवीन संक्रमण पाहून डॉक्टर आणि वैज्ञानिकदेखील आश्चर्यचकित झाले आहेत. उंदरांकडून हा संसर्ग कसा पसरतो हे समजण्यास तेही कमी पडत आहेत. मात्र, दोन वर्षांपूर्वी 2018 मध्ये हॉंगकॉंगमध्ये रॅट हिपॅटायटीस ई विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना नोंदवली गेली. परंतु सीएनएनच्या मते 30 एप्रिल रोजी या संसर्गाचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. (हेही वाचा: रशियामध्ये कोरोना व्हायरसचा हाहाकार, 24 तासांत 11,656 संक्रमित रुग्णांची नोंद; इटली, ब्रिटनला टाकले मागे)

डॉक्टरांच्या मते, आरएटी HEV च्या संसर्गानंतर रुग्णाला ताप, उलट्या, कावीळ आणि सांधेदुखीची लक्षणे दिसतात. परंतु रोग या आजारामुळे प्रतिकारशक्ती कमकुवतपणा असलेल्या रुग्णांचे यकृत निकामी होते. हाँगकाँगच्या बाहेर, केवळ कॅनडामध्ये, 2019 मध्ये, HEV संसर्गग्रस्त व्यक्ती आढळली होती. आता हॉंगकॉंगच्या आरोग्य विभागाने उंदीरपासून पसरणाऱ्या या रहस्यमय विषाणूचा इशारा दिला असून, लोकांना जागरुक राहण्यास सांगितले आहे.