Surgical Strike 2: पाकिस्तान मध्ये भारतीय चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी
आता पाकिस्तानकडून भारतीय चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
Surgical Strike 2: भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) पाकव्याप्त काश्मिरवर केलेल्या हल्ल्याचे पडसाद आता विविध गोष्टींवर पडत आहे. त्यात आता पाकिस्तानकडून भारतीय चित्रपट आणि जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्ताान माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री चौधरी फवाद हुसैन (Choudhary Fawad Hussain) यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच हुसैन यांनी असे म्हटले आहे की, पाकिस्तानमधील सिनेमा एक्झिबिटर्स असोशिएशन यांनी भारतीय सिनेमा आणि जाहिरातींवर बंदी घातली आहे. त्यामुळे यापुढे पाकिस्तानात कोणताही भारतीय सिनेमा प्रदर्शित केला जाणार नाही.(हेही वाचा-Surgical Strike 2: भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त काश्मिरवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तान कडून LOC वर गोळीबार सुरु)
त्याचसोबत पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलॅटरी अथॉरिटीला भारतात निर्मित झालेल्या जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. तर आज भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करुन पुलवामा मधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या हल्ल्यात सुमारे 200 दहशतवादी मारले गेले असल्याचे सांगितले जात आहे.