'अवकाशातून भारताचा अद्भूत नजारा'; पहा लवकरच भारत भेटीवर येण्याची योजना आखणार्या Sunita Williams काय म्हणाल्या?
सुनिता यांनी आपण लवकरच निश्चित भारतभेटीवर जाणार असल्याचं म्हटलं आहे.
अंतराळामध्ये 278 दिवस International Space Station मध्ये राहिल्यानंतर Sunita Williams पृथ्वीवर परतल्या आहेत. मंगळवारी (1 एप्रिल) त्यांनी मीडीयाशी बोलताना आपले अनुभव सांगितले आहेत. यावेळी विविध गोष्टींवर बोलताना सुनिता विल्यम्स यांना भारताबद्दलही काही प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान सुनिता या भारतीय वंशाच्या आहे. त्यांचे वडील गुजरात मधील होते. शिक्षण आणि नोकरीसाठी ते अमेरिकेत स्थायिक झाले. सुनिता यांनी आपण लवकरच निश्चित भारतभेटीवर जाणार असल्याचं म्हणाल्या आहेत.
अवकाशातून भारत देश कसा दिसतो?
सुनिता विल्यम्स यांनी अवकाशातून भारत कसा दिसतो? याबद्दलही भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्यामते अवकाशातून हिमालयाचा नजारा देखणा होता. “India is amazing,” असं म्हणताना त्यांनी जितक्या वेळेस आम्ही भारतावरून गेलो तितक्या वेळेस आम्हांला खास फोटोज मिळाले आहेत. त्यांनी जगातील youngest mountain range च्या भू-रचनेबद्दल देखील सांगितले, एखाद्या लाटेप्रमाणे त्या भारतात वाहत असल्यासारखं दिसतं असेही त्या म्हणाल्या आहेत.
भारतभेटीवर निश्चित येणार
सुनिता विल्यम्स यांना भारतभेटी बद्दल विचारलं असता त्यांनी भारत हा एक उत्तम लोकशाही असलेला देश आहे असं म्हटलं आहे. लवकरच मी माझ्या वडिलांच्या देशाला भेटीसाठी जाणार असल्याचं म्हटलं आहे. भारत भेटीबद्दलच्या या अपडेट मुळे तिच्या भारतीय चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण झाला, ज्यांपैकी बरेच जण तिचे केवळ अंतराळातील कामगिरीबद्दलच नव्हे तर तिच्या मुळाशी असलेल्या अभिमानाबद्दलही कौतुक करतात.नक्की वाचा: Mahakumbh 2025 From Space: पृथ्वीवर परतलेल्या Sunita Williams यांनी अंतराळातून काढले प्रयागराज महाकुंभाचे नयनरम्य फोटो; कुटुंबाला पाठवले होते (See) .
सुनिता विल्यम्स यांनी भारताच्या वाढत्या space program चे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ दिला आणि त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची कदर केली. त्यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांना भेटण्याची आशा व्यक्त केली, जे भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेचा भाग बनणार आहेत आणि दुसऱ्या खाजगी मोहिमेत, Axiom-4 मधून अंतराळात जाणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)