Sunita Williams आणि Butch Wilmore यांना पृथ्वीवर परतण्यासाठी फेब्रुवारी 2025 उजाडण्याची शक्यता; NASA ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Wilmore आणि Williams साठी आगामी Crew Dragon अवकाशात जाईल यामध्ये पण त्यामध्ये दोन जागा रिक्त ठेवण्यासाठी नासा SpaceX सोबत संभाव्य योजनांवर चर्चा करत आहे.

Sunita Williams | X

NASA अधिकार्‍यांनी अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore यांच्याबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS), बोईंगच्या स्टारलाइनर ऐवजी फेब्रुवारी 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगन ने ते पृथ्वीवर परत येऊ शकतात. हा निर्णय Starliner Spacecraft,च्या चालू Safety Evaluations च्या परिणामांवर अवलंबून आहे, ज्यामध्ये अनेक तांत्रिक समस्या आल्या आहेत.

सुरुवातीला हे मिशन सुमारे आठ दिवसांचे होते, परंतु स्टारलाइनरवरील Propulsion system समस्यांमुळे ते आता वाढविण्यात आले आहे. या समस्यांमुळे नियोजनानुसार त्यांना सुरक्षितपणे पृथ्वीवर परत करण्याच्या अवकाशयानाच्या क्षमतेबद्दल चिंता वाढली आहे.  बोईंग या समस्या दूर करण्यासाठी टेस्टिंग कॅम्पेन राबवत आहेत. ज्यामध्ये Thruster Failuresआणि हीलियमची गळती यांचा समावेश आहे.

जर नासाने स्टारलाइनरचे मिशन बदलण्याचा निर्णय घेतला, तर बोईंग स्पेसक्राफ्टला रिकामं परत आणावं लागणार आहे. हा बोईंगसाठी एक मोठा धक्का असेल. ज्याने आधीच व्यवस्थापन समस्या आणि अभियांत्रिकी समस्यांसह स्टारलाइनर विकसित करण्यात असंख्य आव्हानांचा सामना केला आहे.  बोईंगला स्टारलाइनरच्या विकासासाठी 2016 पासून  $1.6 अब्ज खर्च आला आहे, ज्यात सध्याच्या चाचणी मोहिमेसाठी $125 दशलक्ष खर्चाचा समावेश आहे. पण स्टारलाइनर स्पेसक्राफ्टमधून परत आणणे हा नासाचा मुख्य उद्देश आहे. सध्या नासा कडून मात्र इतर पर्यायांचा देखील विचार सुरू आहे. नक्की वाचा:  Sunita Williams Dancing in Space: अंतराळ स्थानकावर पोहोचल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी केला डान्स, नासाने शेअर केला Video. 

नासा कडून अंतराळवीरांना परत आणण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार सुरू

Wilmore आणि Williams साठी आगामी Crew Dragon अवकाशात जाईल यामध्ये पण त्यामध्ये दोन जागा रिक्त ठेवण्यासाठी नासा SpaceX सोबत संभाव्य योजनांवर चर्चा करत आहे. या योजनेमध्ये अंतराळवीरांना 2025 च्या सुरुवातीला पृथ्वीवर परत आणण्यासाठी सप्टेंबर 2024 मध्ये प्रक्षेपित होणाऱ्या SpaceX च्या क्रू-9 मिशनचा वापर करणे समाविष्ट आहे. क्रू ड्रॅगन अंतराळयान केवळ दोन प्रवाशांना ISS वर घेऊन जाण्यासाठी तयार केले जाईल. Crew-9 टीम सोबत विल्यम्स आणि विल्मोर परत येतील.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now