सुमन बोडानी: हिंदू महिला पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच न्यायाधीश; सर्व स्तरातून कौतुक

टक्केवारीत बोलायचे तर, पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2 टंक्के हिंदू भारतात राहतात. यापूर्वी राना भगवान दास हे पाकिस्तानमधील हिंदू समाजातील पहिले न्यायाधीश ठरले होते. त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून कामगिरी बजावली होती.

Suman Bodani:Pakistan's first Hindu Woman civil judge | (Photo Credits Twitter)

पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजातील महिलेला न्यायाधीश ( Hindu Woman Judge in Pakistan) पदावर बसण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. सुमन पवन बोडानी (Suman Bodani) असे महिलेचे नाव आहे. पाकिस्तनच्या सिंध प्रांतातील शाहदादकोट येथील राहणारे डॉक्टर पवन पोदानी यांच्या त्या कन्या आहेत. सुमन यांनी सिव्हील जज/न्यायिक ( Hindu Civil Judge)मॅजिस्ट्रेट मेरीट लिस्टमध्ये 54 वा क्रमांक पटकावला आहे. आमच्या कुटुंबासाठीह हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याची भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

पाकिस्तानमध्ये हिदू धर्मिय लोक अल्पसंख्याक समूदयात येतात. टक्केवारीत बोलायचे तर, पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ 2 टंक्के हिंदू भारतात राहतात. यापूर्वी राना भगवान दास हे पाकिस्तानमधील हिंदू समाजातील पहिले न्यायाधीश ठरले होते. त्यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून कामगिरी बजावली होती. (हेही वाचा, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक 2020 च्या शर्यतीत उतरणाऱ्या पहिल्या हिंदू उमेदवार Tulsi Gabbard यांच्याबद्दल काही खास गोष्टी!)

मार्च 2018 मध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) चे नेता कृष्णा कुमारे यांनी खासदारकीची निवडणूक जिंकली होती. त्या पाकिस्तानच्या संसदेत खासदार बनलेल्या पहिल्या हिंदू महिला खासदार होत्या. त्या दलीत कुटुंबातील आहेत. आपण नेहमीच दलितांच्या उद्धारासाठी लढू तसेच, महिला सशक्तीकरण, आरोग्य आणि शिक्षण आदींसाठी मी नेहमी कार्यकरत असेन अशी भावना कृष्णा कुमारी यांनी निवडून आल्यानंतर व्यक्त केली होती.